काल संध्याकाळपासून अनेकांच्या व्हॉट्सअॅप स्टेट्सवर, सोशल मीडिया अंकाऊटवर एकच व्हिडीओ दिसत होता. हा व्हिडीओ म्हणजे एका चिमुरडीचा शिवगर्जना देतानाचा व्हिडीओ. अवघ्या काही मिनिटात हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि महाराष्ट्रातील अगदी प्रत्येकाने तो पाहिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कुठला आहे हा व्हिडीओ?

ज्यांनी ज्यांनी हा व्हिडीओ पाहिला त्यांच्या अंगावर काटा आला. रविवारी २ जानेवारी रोजी झालेल्या जीवधन किल्ल्याच्या ‘स्वराज्याचे प्रवेशद्वार, दुर्गार्पण सोहळा’ पार पडला. याच सोहळ्यादरम्यानचा हा व्हिडीओ आहे.

@sahyadri_pratishthan_offical या इंस्टाग्राम पेजने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये एक चिमुकली आईचा कडेवर बसून हात छातीवर ठेवून किल्ल्याच्या प्रवेशद्वाराकडे बघत ‘गडपती, गजअश्वपती, भूपती…’ असं म्हणत शिवगर्जना देताना आपल्याला दिसते. व्हिडीओच्या कॅप्शननुसार या चिमुरडीचं नाव देवांशी आहे. या व्हिडीओला ‘संस्कार सह्याद्रीचे, सह्याद्रीची बाल दुर्गसेविका, देवांशी किल्ले जीवधन प्रवेशद्वार सोहळ्यात गारद, सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान’ असं कॅप्शन देण्यात आलं आहे.

(हे ही वाचा: या फोटोत लपलाय बिबट्या, तुम्ही शोधू शकता का?)

किल्ले जीवधन वर एक पायरीमार्ग अक्षरश: बुजला होता त्याकडे कोणी पाहतही नव्हतं नुसतं गड चढून वर जायचं म्हणलं तरी दमछाक होते असा हा जीवधन किल्ला त्याचा पायरी मार्गाला मोकळं करायचं सहयाद्रीच्या दुर्गसेवकानी ठरवलं २७ ते २८ मोहिमा ठेवून अखेरीस त्या पायरी मार्गाने मोकळा श्वास घेतला. रात्रभर जागून सलग १२ तास काम केलं त्यानंतर प्रवेशद्वार वर घेऊन जाण्यात आले आणि सह्याद्री प्रतिष्ठान शिवजन्मभूमीने घेतलेला संकल्प पूर्ण झाला.

(हे ही वाचा: बँक लॉकरमध्ये सापडलं ५०० कोटी किमतीचे पन्ना शिवलिंग, आहे १००० वर्षे जुनं)

(हे ही वाचा: ‘खलनायक हूं मैं’ गाण्यावर पिस्तूल घेऊन बुलेटवर स्टंट; video viral होताच पोलिसांनी पकडले)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

व्हायरल झालेला हा व्हिडीओ अनेक पेजवरून पोस्ट करण्यात आला आहे. जवळ जवळ १० हजारापेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ बघितला आहे. अनेकांनी या व्हिडीओ कमेंट्स करत या मुलीचं कौतुक केलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gadpati gajashwapati bhupathi little girls shivgarjna video viral ttg