गेल्या वर्षभरापासून करोनाने जगभर कहर केला आहे. या वर्षी आलेल्या करोनाच्या दुसऱ्या लाटेतून आपला देश सावरण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी लावण्यात आलेले लॅाकडाऊनचे निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात येत आहेत. असं असलं तरीही अद्याप राज्यात चित्रपटगृह पूर्ण क्षमतेने सुरु करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील महत्त्वाचा अध्याय सांगणारा ‘पावनखिंड’ हा भव्य-दिव्य आणि ऐतिहासिक चित्रपट १८ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे.
काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘पावनखिंड’ने बॉक्स ऑफिसवर धमाका करत आपण कुठेच कमी नसल्याचं दाखवून दिलं. मराठा योद्ध्यांची शौर्यगाथा असलेल्या ‘पावनखिंड’नं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. सध्या सोशल मीडियावर याच चित्रपटाची चर्चा आहे. चित्रपटाविषयी अनेक गोष्टी, पोस्ट सध्या व्हायरल होत आहेत. दरम्यान चित्रपटगृहातील एक आगळा वेगळा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
(हे ही वाचा: ऑनलाइन क्लासचा प्रभाव! मुलाने ‘या’ इंग्रजी शब्दाला दिले नवीन नाव, हा Viral Video एकदा बघाचं)
काय आहे व्हिडीओमध्ये?
या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक तरुण चित्रपटगृहात पावनखिंड चित्रपट संपताना शिवगर्जना देत आहे. या व्हिडीओ पाहून नक्कीच तुमच्या अंगावर काटा येईल. अवघ्या ३० सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. ‘व्हायरल गप्पा’ या फेसबुक पेजवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
(हे ही वाचा: तुफान वादळात लँडिंग करताना कॉकपिटमधलं थरारक दृश्य दाखवणारा Video Viral)
(हे ही वाचा: ‘या’ व्हायरल फोटोत दडलेला आकडा तुम्ही सांगू शकता का? ९९ टक्के लोक ठरले अपयशी)
नेटीझन्सच्या प्रतिक्रिया
या व्हिडीओला आत्तापर्यंत १५६ हजार लोकांनी बघितलं आहे. १० हजाराहून जास्त लोकांनी याला पसंती दर्शवली आहे तर, अनेकांनी यावर कमेंट्सही केल्या आहेत.