अचानक एखादी दुःखद किंवा धक्कादायक बातमी ऐकल्यानंतर हृदयविकाराचा झटका आला असल्याचं आपल्या ऐकिवात असेल. पण आनंदाची बातमी ऐकताच हृदयविकाराचा झटका येणं, हे आपण क्वचित कधी ऐकलं असेल. सिंगापूरच्या मरिना बे सँड्स कॅसिनोमध्ये अशीच एक घटना घडली आहे. याठिकाणी जुगार खेळणाऱ्या एका जुगाऱ्याला ३.२ पाऊंड्सचा (भारतीय रुपयांमध्ये ३३.८७ कोटी) जॅकपॉट लागला. मात्र हा आनंद जीवघेणा ठरला. जॅकपॉट लागल्याचे कळताच काही सेकंद आनंद व्यक्त करून जुगारी खाली कोसळला. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सिंगापूरच्या प्रसिद्ध मरिना बे सँड्स कॅसिनोमधील घटना सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. एका जुगाऱ्याला जुगारात तब्बल ३४ कोटींचा जॅकपॉट लागल्यानंतर तो हवेत हात उंचावून आनंद व्यक्त करतो. काही सेकंद विजयाचा आनंद व्यक्त करताच सदर इसम धाडकन जमिनीवर कोसळतो. जमिनीवर कोसळल्यानंतर कॅसिनोत उपस्थित असलेल्या लोकांनी या घटनेचा व्हिडीओ काढला. ज्यामध्ये लोकांमध्ये घबराट पसरल्याचे दिसत आहे. कॅसिनोतील कर्मचारी सदर व्यक्तीकडे धाव घेऊन त्याला काय झालं, हे पाहत आहेत.

Police found dead body of a man in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? ८ तास तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला
Viral Video: Girl's Rain Dance Interrupted By Thunderbolt Scare shocking video
VIDEO: निसर्गापुढे माणूस दुबळाच! ‘ती’ रील्स बनवत होती आणि वीज पडली; तुम्हीच सांगा तरुणीचं काय चुकलं?
If You Dont Believe In Luck And Karma Then Just Watch This Video how man skip death
नशीब आणि कर्मावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; अवघ्या ३ सेंकदात तरुणासोबत नेमकं काय घडलं?
How Do Shopkeepers Cheat Desi Jugaad Video Viral on social Media
फळ-भाजी विक्रेते तराजूने कशी फसवणूक करतात बघा; पुढच्या वेळी नुकसान टाळायचं असेल तर ‘हा’ VIDEO पाहाच
Lion attack on man shocking video goes viral
‘आयुष्यात एका सेंकदाचं महत्त्व काय?’ सोशल मीडियावर व्हायरल होणारा ‘हा’ VIDEO बघून झोप उडेल
Bird video goes viral
VIDEO: ‘आयुष्यभर कितीही पैसा कमवा शेवटी’ पक्ष्याचा हा व्हिडीओ पाहून कळेल पैसा वास्तव आहे, पण यश नव्हे
Bees attacked on women who had gone for vatpaurnima in Nive village of Poladpur taluka
रायगडात वटपूजन करताना अघटित घडले… जाणून घ्या काय आहे प्रकार…
success story Heartbroken lover become officer after his girlfriend reject him
VIDEO: स्पर्धा परीक्षेत नापास झाला अन् प्रेयसी सोडून गेली; पुढच्या वर्षी पास होत तिच्याच घरासमोर लावल्या ७५ तोफा

सुंदर पिचाई, सत्या नडेला यांच्यापेक्षाही ‘हा’ भारतीय वंशाचा CEO अमेरिकेत घेतो सर्वाधिक वेतन?

सदर व्यक्तीबरोबर एक महिला असल्याचे दिसते. तिने मदतीसाठी हाका दिल्यानंतर कर्मचारीही तातडीने त्याला सीपीआर देण्याचा प्रयत्न करतात. ज्यामुळे सदर व्यक्ती शुद्धीत येतो. त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलविले जाते.

ही घटना २२ जून रोजी घडल्याचे सांगितले जाते. मरिन बे सँड्स हे सिंगापूरच्या मध्यवर्ती व्यापारी जिल्ह्यातील एक प्रमुख कॅसिनो आहे. याची मालकी अमेरिकेतील लास वेगास सँड्स या कॅसिनोकडे आहे. या कॅसिनोने आतापर्यंत अशा अनेक नाट्यमय घडामोडी पाहिल्या आहेत. अनेकांनी आपली कमाई इथे बुडवली आहे, तर काहींना असाच अनपेक्षित धनलाभ झालेला आहे.