Ganapati Visarjan dance of uncle went viral: ७ सप्टेंबरला गणरायाचं आगमन झालं आणि देशभरात एकच जल्लोष झाला. घरोघरी, मोठ-मोठ्या मंडळांमध्ये गणपती बाप्पा विराजमान झाले. या ११ दिवसांच्या सणांमधले ७ दिवस कधी निघून गेले हे कळलंसुद्धा नाही.

गणपती बाप्पाच्या आगमनानंतर सगळ्यांना गौरीच्या आवाहनाची ओढ लागली होती. यंदा १० सप्टेंबर रोजी गौराईचं आवाहन झालं आणि १२ सप्टेंबर रोजी गौरी-गणपतींचं विसर्जन झालं.

IShowSpeed performs daring backflip on Guatemalas Hand of God‘You have to stop risking your life for these reels
१७ सेकंदाच्या व्हिडीओसाठी युट्युबरने गमवला असता जीव! ‘हँड ऑफ गॉड’वर केली स्टंटबाजी, थरारक Video Viral
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Little girl dance
‘आरारारा खतरनाक…’ स्केटिंग शूज घालून चिमुकलीने केला ‘पीलिंग्स’ गाण्यावर हटके डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
kiliye kiliye new song
‘काय ती स्टाईल….काय तो स्वॅग…सगळंच एकदम भारी!’ चिमुकल्याचा डान्स पाहून नेटकऱ्यांना Jr. NTR आठवला…Viral Video बघाच
Lakhat Ek Aamcha Dada
Video: ‘लाखात एक आमचा दादा’मध्ये मारामारीच्या सीनचे ‘असे’ झाले शूटिंग; पाहा व्हिडीओ
Irfan Pathan Showed how Cameraman zoom on fans during live cricket match watch video
Irfan Pathan : लाइव्ह मॅचमध्ये चाहत्यांवर कसा झूम होतो कॅमेरा? इरफान पठाणने शेअर केला खास VIDEO
mantra of happy married life
Video : नात्यांमध्ये इगो बाजूला ठेवा, काका काकूंनी सांगितला सुखी संसाराचा मंत्र, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “ही अरेंज मॅरेजमधील सुंदरता आहे..”

बाप्पाच्या या विसर्जनाच्या मिरवणुकीत भजन म्हणत, तर नाचत गात भक्तजन अगदी मग्न होऊन जातात. पाणावलेल्या डोळ्यांनी, मनात असंख्य भावना घेऊन बाप्पाचं अगदी जल्लोषात विसर्जन पार पाडलं जातं.

हेही वाचा… किती गोड! मूषकाने बाप्पासमोर जोडले हात अन्…, भक्ताचा VIDEO पाहून व्हाल थक्क

गणेशोत्सवादरम्यान या सगळ्या क्षणांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. आजही असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय, जो पाहून तुमच्याही चेहऱ्यावर आपसूकच आनंद येईल. या व्हिडीओत गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत एक माणूस अगदी भान हरपून डान्स करताना दिसत आहे.

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल झालेल्या या व्हिडीओत गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत बेंजोची साथ देताना एक काका दिसत आहेत. बेंजोच्या तालावर या काकांनी अगदी जल्लोषात ठेका धरला आहे. अगदी आनंदात ते या मिरवणुकीत ‘गणपती डान्स’ करत सहभागी झाल्याचं दिसतंय. आजूबाजूच्या घोळक्यात ते एकटेच बेंजो वाजवणाऱ्या कलाकारांच्या मधोमध डान्स करताना दिसतायत. त्यांचा डान्स पाहून मग एक माणूस त्यांच्या या जल्लोषात सामील झाला आणि अखेर या काकांनी एका पोलिस अधिकाऱ्यालाही ठेका धरायला भाग पाडलं.

@starryeyes2054 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून “अगदी मनापासून डान्स करणाऱ्या या माणसाला पाहून मला आनंद होत आहे”, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. तसंच कॅप्शनमध्ये त्याने #सिद्धिविनायक गणपती विसर्जन असंदेखील लिहिलं आहे. या व्हिडीओला सात लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज आले आहेत.

हेही वाचा… ‘आज की रात…’, भर वर्गात दोन विद्यार्थींनींचा ‘असा’ डान्स पाहून म्हणाल, कहरच…, पाहा VIRAL VIDEO

युजर्सच्या प्रतिक्रिया

बाप्पाच्या विसर्जनातील हा व्हिडीओ व्हायरल झालेला पाहून अनेकांनी यावर आपल्या भावना व्यक्त करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने कमेंट करत लिहिलं, “काकांनी तर आनंदात ठेका धरला आहे.” तर दुसऱ्याने “यालाच म्हणतात अगदी मनापासून नाचणं”, अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “आनंदासमोर वय भान नाही ठेवत, खूप छान काका.”

Story img Loader