भारतासह संपूर्ण जगात महात्मा गांधी यांची १५०वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. या दिवशी विविध सांस्कृतीक कार्यंक्रमांचे आयोजन करुन गांधीजींना आदरांजली वाहिली जात आहे. सौदीची राजधानी रियाध येथेही भारतीय दूतावासातर्फे गांधी जयंती मोठ्या थाटात साजरी केली गेली. या कार्यक्रमात महात्मा गांधींचे आवडते भजन वैष्णव जन तो तेने कहिये गायले गेले. या भजनाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
href=”https://twitter.com/hashtag/GandhiJayanti?src=hash&ref_src=twsrc%5Etfw”>#GandhiJayanti Celebrations in #Riyadh organised by @IndianEmbRiyadh pic.twitter.com/7PPlbJ6Ckc

— Nouf Almarwaai نوف المروعي  (@NoufMarwaai) October 1, 2019

ट्विटरवर शेअर केल्या गेलेल्या या व्हिडीओवर आतापर्यंत १९००० यापेक्षा अधिक लोकांनी आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहे.
वैष्णव जन तो तेने कहिये हे देशातील सर्वात लोकप्रिय भजनांपैकी एक म्हणून ओळखले जाते. गुजराती भाषेत असलेल्या या भजनाची निर्मिती संत नरसिंह मेहता यांनी १५व्या शतकात केली होती. आजही अनेक सांस्कृतीक कार्यक्रमांची सुरवात या भजनाने केली जाते.

Story img Loader