गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर व्हायरल झालेला एक फोटो सध्या व्हॉट्स अॅप, ट्विटर, फेसबुकवर चर्चेचा विषय ठरतो आहे. एका मुलीने आपल्या शाळेच्या प्रयोगवहीत चक्क ५०० आणि २ हजार रुपयांच्या नोटांवरील गांधींजींचे फोटो कापून चिटकवल्याचे या फोटोत दिसते आहे. या फोटोमधली मुलगी नेमकी कोण?, हा फोटो कोणी काढला? किंवा कोणी अपलोड केला ? याबद्दल काहीच माहिती उपलब्ध नसली तरीही हा फोटो मात्र कालपासून सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालतो आहे.

Viral Video : वर्ग झाला ‘डान्स फ्लोअर’; विद्यार्थ्यांचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल

‘नरेंद्र मोदी नोटाबंदीचा निर्णय लागू करून जे करू शकले नाही ते या छोट्याशा मुलीने आपल्या प्रयोगातून करून दाखवलं’, ‘निरागसपणे इतकी मौल्यवान मानवंदना गांधींजींना आतापर्यंत कोणीच वाहिली नसेल’, ‘गांधींच्या नावाखाली आपली तिजोरी भरणाऱ्यांना या मुलींने चांगलीच चपराक लगावली आहे’, अशा अनेक प्रतिक्रिया या फोटोवर येत आहे.

अनेकदा काही सॉफ्टवेअर वापरून खऱ्या फोटोमध्ये फेरफार केला जातो. हा फोटो कदाचित फोटो मॉर्फिंगचा प्रकार असू शकतो, असंही बोललं जात आहे. आता या फोटोमागचं सत्य जरी उघड झालं नसलं तरी लोकांनी मात्र या फोटोवर उपरोधिक शैलीत सोशल मीडियावर एकापेक्षा एक भन्नाट प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

… म्हणून मार्क झकरबर्गने मागितली जाहीर माफी

Story img Loader