Ganesh Chaturthi 2023 Marathi Wishes HD Image: गणपती माझा नाचत आला.. म्हणत अखेरीस तो दिवस उजाडणार! ३६५ दिवसांची प्रतीक्षा संपवून बाप्पा तुमच्या आमच्या घरी येणार आहेत. स्वागताची तयारी तर तुम्हीही केली असेल पण अलीकडे कोणताच सण ऑनलाईन शुभेच्छा दिल्याशिवाय पूर्ण होत नाही असं म्हणतात अशा वेळी तुम्हालाही उद्याच्या दिवशी Whatsapp Status, Facebook Post, Instagram Story वरून गणेश चतुर्थी निमित्त शुभेच्छा देणारे HD फोटो शेअर करायचे असतील तर आजच ही शुभेच्छापत्र फ्रीमध्ये डाउनलोड करून ठेवू शकता. तुमच्या मनातील भाव अगदी सुंदर शब्दात व्यक्त करणाऱ्या काही गणेशोत्सवाच्या मराठमोळ्या शुभेच्छा पाहूया..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गणेशोत्सवाच्या मराठी शुभेच्छा

तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना…
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया!

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा
सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…

स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ते तुझ्या चरणाशी आहे
कितीही मोठी समस्या असू दे बाप्पा तुझ्या नावातच समाधान आहे
गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा

वंदितो तुज चरण आर्जव करतो गणराया
वरदहस्त असूद्या माथी
राहूद्या सदैव छत्रछाया
गणपती बाप्पा मोरया

माझं आणि बाप्पाचं खूपच छान नातं आहे
जिथे मी जास्त मागत नाही
आणि बाप्पा मला कमी पडू देत नाही
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

तसेच तुम्हा वाचकांसाठी लोकसत्ता.कॉमने यंदाही एक खास संधी आणली आहे. यंदाच्या गणेशोत्सवात तुमच्या ‘घरचा गणेश’ व्हायरल करण्यासाठी तुम्ही तुमच्या घरातील बाप्पाचे फोटो लोकसत्ता. कॉम वर अपलोड करू शकता. कसं ते जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा! तुमच्या सर्व इच्छा बाप्पा पूर्ण करो.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh chaturthi 2023 marathi wishes hd image free download to share on whatsapp status facebook instagram gif sticker svs