Ganesh Chaturthi 2023: काय मग मंडळी गणेशोत्सवाची लगबग सुरू असेल ना? दिवा ताम्हणाला लख्ख करण्यापासून ते सजावट, नैवेद्य सगळी धावपळ तुमच्याकडेही सुरू असेल, हो ना? अशावेळी आज आम्ही तुमचा जास्त वेळ खर्ची न करता थेट मुद्द्याचं सांगणार आहोत. आता तुम्ही एवढी तयारी करताय म्हणजे साहजिकच फोटोशूट पण मस्त होईलच. दरवेळी फोटो काढल्यावर आपण फार फार तर Whatsapp Status, Instagram Story, FB Post यावरच शेअर करतोय. फार फार तर काय ओळखीच्या चार नातेवाईकांना पाठवतो पण यावेळी तुमच्या ‘घरचा गणेशा’ सातासमुद्रापार पोहोचवण्याची संधी आम्ही आणली आहे. तुम्ही तुमच्या घरचा गणेशाचा फोटो लोकसत्ता.कॉम वर अपलोड करू शकता ज्यामुळे लाखो वाचकांना तुमची सजावटीची भन्नाट कल्पना व सुंदर बाप्पाचे दर्शन घेता येईल. अगदी काही सेकंदात तुम्ही अपलोड प्रक्रिया पूर्ण करू शकता. कशी ते ही पाहूया..
लोकसत्ता. कॉमवर घरच्या गणेशाचा फोटो अपलोड करण्याच्या स्टेप्स –
- loksatta.com च्या ‘होम पेज’वरील ‘घरचा गणेश’ बॅनरवर क्लिक करा.
- आता नवीन टॅब उघडेल. येथे फोटो अपलोड करून तुमची माहिती भरा आणि ई-मेल आयडीने साइन अप करा.
- मोबाइल कॅमेऱ्याने काढलेला फोटो थेट अपलोड करण्याची सुविधा याठिकाणी उपलब्ध आहे.
- फोटोची फाईल साइज ५ एमबीपेक्षा कमी असावी. फोटो JPG, JEPG व PNG फॉरमॅट मध्ये असावा.
वाचकांनो, तुम्ही शेअर केलेल्या फोटोजमधील काही निवडक फोटो हे लोकसत्ताच्या ऑनलाईन वेबसाईटवर झळकणार आहेत. तुम्हा सर्व वाचकांना लोकसत्ता ऑनलाइनच्या कुटुंबाकडून गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या बाप्पाचे फोटो पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.