konkan Ganesh Chaturthi 2024 Mumbai Goa Highway Traffic : लाडक्या बाप्पाच्या आगमनाची आता सर्वांनाच आतुरता निर्माण झाली आहे. घरोघरी सजावटीसाठी, नैवेद्यासाठी कोणते पदार्थ बनवायचे याचे प्लॅनिंग सुरू आहे; तर दुसरीकडे गणेशोत्सवानिमित्त मुंबईहून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची लगबग सुरू आहे. यामुळे मुंबईसह सर्व महामार्गावर वाहनांची मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. पण, दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकणवासीयांना मुसळधार पावसाबरोबर खड्ड्यांतून मार्ग काढत कोकणात पोहोचावे लागतेय. याशिवाय कोकणात जाणाऱ्या ट्रेनदेखील फूल भरून जात आहेत. कोकणवासीय जागा मिळेल तिथे बसून आपल्या गावी जात आहेत. तर मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी दिसून येत आहे. विशेषत: माणगाव इंदापूर मार्गावर वाहनांच्या लांबलांब रांगा लागल्या आहेत. सध्या याच मार्गावरील एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हाला किती वाहतूक कोंडी आहे याचा अंदाज येईल, त्यामुळे तुम्हीपण गणपतीनिमित्त गावाला निघाला असाल तर हा व्हिडीओ आधी पाहा.

Ganesh Utsav 2023 : मुंबईतील सात लोकप्रिय व मानाचे गणपती कोणते? जाणून घ्या …

The unique friendship of a leopard and a deer
“अशी मैत्री कधी पाहिली नसेल…” बिबट्या आणि हरणाची अनोखी मैत्री; VIDEO पाहून व्हाल थक्क
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Muramba
Video: “ज्या हातांनी मंगळसूत्र फेकलंस…”, रमा रेवाला देणार सणसणीत उत्तर; ‘मुरांबा’चा जबरदस्त प्रोमो
black leopard maharashtra
Video: महाराष्ट्रात वाढताहेत काळे बिबट…
Puneri kaka dance video uncle aunty dance video goes viral on social media
VIDEO: पुणेकर काकांचा नाद नाय! चंद्रा गाण्यावर केला खतरनाक डान्स; नेटकरी म्हणतात “आयुष्य असं जगता आलं पाहिजे”
bull Fight Viral Video | Bull Attack on boy Wearing Red Shirt
“शिंगांनी उडवलं अन् लाथांनी तुडवणार इतक्यात…”, पिसाळलेल्या बैलाचा व्यक्तीवर हल्ला; पाहा थरारक Video
Mother Saved Her Daughters Life Who Had Drowned In The Sea Thrilling Video Went Viral
एक लाट अन् माय-लेकींचा थेट मृत्यूशी सामना; नेमकं काय घडलं? Shocking Video पाहून अंगाचा थरकाप उडेल

तासनतास रस्त्यांवर गाड्या पडल्या अडकून

देशभरात ७ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर घरोघरी आणि मंडळांमध्ये लाडके बाप्पा विराजमान होतील, यामुळे कोकणाच्या दिशेने जाणारे सर्व रस्ते वाहनांनी भरून गेले आहेत. गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघे काही तास शिल्लक असल्याने रस्त्यांवरील गर्दी अजून वाढतेय. वाहतूक कोंडी सुटत नसल्याने तासनतास गाड्या रस्त्यांवर अडकून पडल्या आहेत, ज्यामुळे प्रवाशांचेही प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे लोक आता तीव्र संताप व्यक्त करत आहेत. (Ganesh Chaturthi 2024 Viral Video)

“चाकरमान्यांनी ह्या निवडणुकीत बहिष्कार टाका” कोकणवासियांचा संताप

यात माणगाव इंदापूर मार्गावरील एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात रस्त्याच्या दोन्ही बाजूने प्रचंड वाहतूक कोंडी दिसून येत आहे. हा व्हिडीओ ५ सप्टेंबर २०२४ ला अपलोड करण्यात आला आहे, ज्यात एका अपघातामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूने फूल ट्रॅफक जाम झाल्याचे दिसतेय. यामुळे लोक रस्त्यावर उतरून वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत, तर दुसरीकडे वाहतूक कोंडीतही कोकणवासीयांचा गावी जाण्याचा उत्साह मात्र कमी झालेला नाही. लोक गणपती बाप्पा मोरयाचा जयजयकार करत आहेत. गाड्यांमधून गणपती बाप्पाची गाणी ऐकू येत आहेत. पण, दुसरीकडे सोशल मीडियावर लोक या ट्रॅफिक जामला सरकारी यंत्रणा जबाबदार असल्याचे म्हणत संताप व्यक्त करत आहेत. तसेच कुठला नेता काहीही करणार नाही म्हणून चाकरमान्यांनी ह्या निवडणुकीत बहिष्कार टाका, बरोबर लाईनवर येतील, म्हणत आपला राग व्यक्त करत आहेत.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @pooja_tambe08 नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, इंदापूरला एक छोटासा अपघात झाला आहे. कोणतीही जीवितहानी नाही, सर्व सुखरूप आहेत. पण, यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूने सकाळपासूनच फूल जाम आहे, लालपरीपण चालू झाल्या आहेत. येताना सांभाळून या, गाडी सावकाश चालवा.

कोकणात जाणाऱ्यांनो ‘हा’ व्हिडीओ पाहाच

या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, सांगली आणि साताऱ्याचे रस्ते चांगले होऊ शकतात, मग कोकणातले का नाही? कुठे आहेत कोकणातील नेते? दुसऱ्या युजरने लिहिले की, माणगावमधील लोकं त्या रोडवर अनाठायी बाईक, कार उभ्या करतात आणि ही अवस्था होते. बायपास तयार होत आहे, जवळपास मार्ग तयार केला आहॆ. नक्की कुठे अडलंय ते कळत नाही. पण, कोकणात जाणाऱ्यांचे हाल हे कधी संपणार कोणास ठाऊक. तिसऱ्या युजरने लिहिले की, कुठलाही नेता काहीही करणार नाही, म्हणून चाकरमान्यांनी ह्या निवडणुकीत बहिष्कार टाका…. बरोबर लाईनवर येतील. चौथ्या युजरने लिहिले की, या ट्रॅफिकला भाजपाचे नेते जबाबदार आहेत. पाचव्या युजरने लिहिले की, गणपती बाप्पाचा जयजयकार होण्याआधी सर्व नेत्यांचा उद्धार मात्र होत असेल.