Ganesh Chaturthi 2024: लहान मोठ्यांसह सगळेच बाप्पाच्या आगमनासाठी आतुर झालेले असतात. दरवर्षी गणेशोत्सव देशात मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला जातो. याला गणेश चतुर्थी किंवा विनायक चतुर्थी असेही म्हणतात. हा सण भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणपतीचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. 10 दिवस चालणाऱ्या या महोत्सवाची ख्याती संपूर्ण भारतभर पाहायला मिळते. दरम्यान २०२४ ला गणपत्ती बाप्पा कधी आपल्या घरी विराजमान होणार आहेत हे तुम्हाला माहितीये का ? जिथे बाप्पाचा वास असतो तिथे प्रत्येक क्षणी सुख-समृद्धी असते, असेही म्हणतात. मात्र, यावेळी गणेश चतुर्थीच्या नेमक्या तारखेबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. अशा परिस्थितीत या वर्षी गणेश चतुर्थी कधी आहे हे जाणून घेऊया. बाप्पा यायच्या काही महिने आधीच रस्त्यावर बाप्पाच्या आगमानाच्या तारखांच्या पाट्या लावल्या आहेत. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

२०२४ मध्ये बाप्पा कधी येणार?

मुंबईच्या रस्त्यावर यावर्षी बाप्पाचं आगमन कधी होणार आहे याची तारखेसकट माहिती दिली आहे. हा बोर्ड रस्त्याच्या कडेला लावला असून यावर “Save the date 7th september 2024 गणपत्ती बाप्पा मोरया” असं लिहलं आहे. तर हिंदू दिनदर्शिकेनुसार २०२४ मध्ये बाप्पा सप्टेंबरच्या सुरुवातीला आपल्या घरी येतील. ७ सप्टेंबरला बाप्पाचे आगामन होईल तर १७ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी असेल.

मुंबईत लागले बाप्पाच्या आगमनाचे बोर्ड

देशात गणेशोत्सव दरवर्षी मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला जातो. कधी एकदा बाप्पाचे आपल्या घरी आगमन होते, याकडे लहान मोठे असे सगळ्यांचेच लक्ष लागलेले असते. बाप्पाच्या आगमनासाठी सर्वच आतूर झालेले दिसून येतात. असं म्हणतात, जिथे बाप्पाचा वास असतो, तिथे प्रत्येक क्षणी सुख-समृद्धी असते. गणेशोत्सवा दरम्यान भाविक सलग 10 दिवस संपूर्ण विधीपूर्वक गणपतीची पूजा करतात. गणेश चतुर्थीला बाप्पाची पूजा केल्याने सर्व अडथळे दूर होतात अशी धार्मिक भावना आहे.

पाहा कधी येणार बाप्पा

हेही वाचा >> महाकाय अजगराने महिलेला जिवंत गिळलं, लोकांनी अजगरालाच फाडला अन्…थरारक VIDEO पाहून उडेल थरकाप

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून सर्वांनाच आता बाप्पाच्या आगमनाची ओढ लागली आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर mumbai_ganesh_chaturthi नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून गणेशभक्त मोठ्या प्रमाणात व्हिडीओवर प्रतिक्रिया देत आहेत. “आतुरता तुझ्या आगमनाची” “गणपती बाप्पा मोरया ” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.