Ganesh Chaturthi viral video of young man bike stunt: सध्या देशभरात गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातोय. ११ दिवसांच्या या उत्सवाची तयारी गेल्या महिनाभरापासून सुरू झाली आहे. घरोघरी, तसेच लहान-मोठ्या मंडळांत गणरायाचं आगमन झालं असून, भाविकांची गर्दी जमायला सुरुवात झाली आहे.

मुंबई-पुण्यात वाजत-गाजत ढोल-ताशांच्या गजरात गणरायाचं आगमन पार पडलं. देशभरात यानिमित्तानं एक वेगळा माहोल, उत्साह पाहायला मिळतो. यादरम्यान, सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, अशातच आता एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय, जो पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओत एक व्यक्ती बाईकवर गणपती बाप्पाच्या मूर्तीला खांद्यावर घेऊन स्टंट करताना दिसत आहे.

Little girl dance
‘आरारारा खतरनाक…’ स्केटिंग शूज घालून चिमुकलीने केला ‘पीलिंग्स’ गाण्यावर हटके डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
kiliye kiliye new song
‘काय ती स्टाईल….काय तो स्वॅग…सगळंच एकदम भारी!’ चिमुकल्याचा डान्स पाहून नेटकऱ्यांना Jr. NTR आठवला…Viral Video बघाच
Terrifying video of man crossing railway track fell down from barricade accident video viral
“एक मिनिट वाचवण्याच्या नादात सर्व संपून जाईल…” रेल्वे रुळ ओलांडताना बॅरिकेडवर चढला अन् पुढे जे झालं ते पाहून बसेल धक्का, थरारक VIDEO
Heartwarming Message written by a young man on Makar Sankranti
Video : “माणूस तेव्हाच गोड बोलतो..” तरुण खरं बोलून गेला; नेटकरी म्हणाले, “१०० टक्के खरं आहे”
monkey
थेट एसटी बसच्या छतावर बसून माकडाचा ऐटीत प्रवास! Viral Video पाहून नेटकरी म्हणे, “तिकीट काढले का?”
Snake Fighting With A Mongoose Who Will Win In The Jungle Battle Watch This Viral Video on social media
साप आणि मुंगूसामध्ये रंगलं घनघोर युद्ध, मृत्यूच्या खेळात शेवटी कोणी मारली बाजी? VIDEO पाहून थक्क व्हाल एवढं नक्की
Shocking Viral Video Scooter rider drag a man for 1 km
बाईकस्वाराने भररस्त्यात ओलांडली क्रूरतेची मर्यादा! वृद्धाला स्कुटीला बांधत फरपटत नेलं अन्…; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

हेही वाचा… Ganesh Chaturthi: सिद्धिविनायक, दगडूशेठसह ‘ही’ आहेत भारतातील ११ प्रसिद्ध गणेश मंदिरे; या गणेशोत्सवात नक्की भेट द्या

व्हायरल व्हिडीओ

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक तरुण त्याच्या बाईकवरून बाप्पाचं आगमन करताना दिसतोय. पण, ही बाईक तो बसून चालवत नसून, या बाईकवर स्टंट करत उभं राहून तो ही बाईक चालवताना दिसतोय. भररस्त्यात, रहदारीत चालत्या बाईकवर तरुणानं एका खांद्यावर गणपती बाप्पाची मूर्ती घेतली आहे आणि तो ‘देवा श्री गणेशा’ या गाण्यावर थिरकताना दिसतोय.

@amitvermaofficial01 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून, “बाप्पा आ रहे है” अशी कॅप्शन या व्हिडीओला दिली आहे. या व्हिडीओला तब्बल १९.३ दशलक्ष व्ह्युज आले आहेत. तसेच १.९ मिलियन लाइक्सदेखील या व्हिडीओनं मिळवले आहेत.

हेही वाचा… Ganesh Chaturthi: हत्तीनं बाप्पाच्या गळ्यात हार घालून केलं नमन, गणरायाच्या भक्ताने असं केलं बाप्पाचं आगमन, VIRAL VIDEO एकदा पाहाच

युजर्सची प्रतिक्रिया

व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी यावर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकानं कमेंट करीत लिहिलं, “ज्याची रक्षा देव करतो, त्याला कशाचीच भीती नाही, हे तुम्ही सिद्ध केलंत.” तर दुसऱ्यानं, “ही तर गणेशाची सगळ्यात हटके एन्ट्री आहे” अशी कमेंट केली. तिसर्‍यानं कमेंट करीत लिहिलं, “फक्त सोशल मीडियावरील लाइक्स आणि कमेंट्ससाठी तुमचा जीव धोक्यात घालू नका.”

हेही वाचा… Ukadiche Modak Recipe: बाप्पा तुला गोड गोड मोदक घे! गणेशोत्सवात करा बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक; रेसिपी लगेच नोट करा

Story img Loader