Ganesh Chaturthi viral video of young man bike stunt: सध्या देशभरात गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातोय. ११ दिवसांच्या या उत्सवाची तयारी गेल्या महिनाभरापासून सुरू झाली आहे. घरोघरी, तसेच लहान-मोठ्या मंडळांत गणरायाचं आगमन झालं असून, भाविकांची गर्दी जमायला सुरुवात झाली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुंबई-पुण्यात वाजत-गाजत ढोल-ताशांच्या गजरात गणरायाचं आगमन पार पडलं. देशभरात यानिमित्तानं एक वेगळा माहोल, उत्साह पाहायला मिळतो. यादरम्यान, सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, अशातच आता एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय, जो पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओत एक व्यक्ती बाईकवर गणपती बाप्पाच्या मूर्तीला खांद्यावर घेऊन स्टंट करताना दिसत आहे.
व्हायरल व्हिडीओ
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक तरुण त्याच्या बाईकवरून बाप्पाचं आगमन करताना दिसतोय. पण, ही बाईक तो बसून चालवत नसून, या बाईकवर स्टंट करत उभं राहून तो ही बाईक चालवताना दिसतोय. भररस्त्यात, रहदारीत चालत्या बाईकवर तरुणानं एका खांद्यावर गणपती बाप्पाची मूर्ती घेतली आहे आणि तो ‘देवा श्री गणेशा’ या गाण्यावर थिरकताना दिसतोय.
@amitvermaofficial01 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून, “बाप्पा आ रहे है” अशी कॅप्शन या व्हिडीओला दिली आहे. या व्हिडीओला तब्बल १९.३ दशलक्ष व्ह्युज आले आहेत. तसेच १.९ मिलियन लाइक्सदेखील या व्हिडीओनं मिळवले आहेत.
युजर्सची प्रतिक्रिया
व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी यावर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकानं कमेंट करीत लिहिलं, “ज्याची रक्षा देव करतो, त्याला कशाचीच भीती नाही, हे तुम्ही सिद्ध केलंत.” तर दुसऱ्यानं, “ही तर गणेशाची सगळ्यात हटके एन्ट्री आहे” अशी कमेंट केली. तिसर्यानं कमेंट करीत लिहिलं, “फक्त सोशल मीडियावरील लाइक्स आणि कमेंट्ससाठी तुमचा जीव धोक्यात घालू नका.”