मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ४० आमदार आणि खासदारांना सोबत घेऊन शिवसेनेत केलेल्या बंडामुळे संपूर्ण देशात प्रसिद्ध झाले. महाराष्ट्रातील घराघरात एकनाथ शिंदे हे नाव पोहोचले आहे. यानंतर एकनाथ शिंदे यांची राज्यातील राजकीय ताकद वरचेवर वाढतानाच दिसत आहे. यात जनमानसातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एक वेगळी क्रेझ पाहायला मिळतेय. राज्यातील दहीहंडी असो वा गणेशोत्सव दणक्यात साजरा केला पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. त्याप्रमाणे दहीहंडीनंतर गणेशोत्सवही दणक्यात साजरा झाला. या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंदा अनेक गणेश मंडळांना भेटी दिल्या. गणेशोत्सवात आयोजित केल्या जाणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमातही एकनाथ शिंदे यांचीच हवा पाहायला मिळाली. अशाच एका कार्यक्रमातील लहान मुलाचा एत व्हिडीओ व्हायरल होतोय. या मुलाने कार्यक्रमात उपस्थितीतांची मनं जिंकण्यासाठी चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लूक कॅरी केला होता. त्यामुळे हे चिमुकले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या इंटरनेटवर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.हा व्हिडीओ पाहून बच्चे कंपनीलासुद्धा एकनाथ शिंदेंची भुरळ पडल्याचे दिसतेय. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा