Mumbai Goa Highway Traffic live status: अवघ्या एका दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मुसळधार पाऊस आणि खड्ड्यांचा सामना करत मुंबईकर कोकणात दाखल व्हायला सुरवात झाली आहे. पण, त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहानांची प्रचंड मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. गणपती बाप्पाच्या स्वागताची सर्वत्र जय्यत तयारी चालू असून मुंबई, पुण्यामध्ये राहणाऱ्या चाकरमान्यांचीही गावी जाण्याची गडबड सुरू आहे. नोकरी, तसेच व्यवसायानिमित्त मुंबईत राहणाऱ्या कोकणातील चाकरमानी गावाकडे निघाल्याने बसस्थानके, रेल्वेस्टेशन गर्दीने फुलून गेले असून दोन दिवसांपासून मुंबई- गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. याच गर्दीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा