महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला बाप्पाच्या आगमनाची आस लागलेली असते. सध्या अनेक मोठ्या-मोठ्या गणपतीचे मंडळात ढोल-ताशांच्या गजरात आगमन झाले आहे. मंडपाची तयारी, फुलांची आरास, जागोजागी बाप्पाच्या रंगकामाची तयारी पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी सार्वजनिक मंडळात गणेशाचे आगमन झाले आहे. परंतु, घरांमध्ये गणपती येणाऱ्यासाठी अवघे १६ दिवस बाकी आहे. मुंबईत गणपतीचा उत्सव थाटात होत असतो. उंच गणेशमूर्ती आणि भव्यदिव्य सजावट हे मुंबईतील गणेशोत्सवाचं मुख्य आकर्षण असतं. सर्वांनाच बाप्पाच्या भेटीची ओढ लागली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बाप्पाच्या मिरवणुकीत अनोखी पाटी

यंदा ७ तारखेपासून गणपती उत्सव सुरू होईल आणि १७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थीला गणपती बाप्पाचं विसर्जन होईल. दहा दिवसांचा हा उत्सव सर्वांसाठी खूप खास असतो. वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात मुंबईतील गणेश आगमन सोहळे सुरू झाले आहे. अशातच बाप्पााच्या आगमनावेळी झळकलेली एक पाटी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.ही पाटी पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हसू उमटेल. ही पाटी तुम्हालाही विचार करायला भाग पाडेल.

“फक्त मनाने चांगले राहा…”

बाप्पाच्या आगमनात झळकवलेली हे पाटी वाचून तुमच्याही चेहऱ्यावर हसू आणेल. असं या पाटीवर लिहलंय तरी काय ? तर या पाटीवर “फक्त मनाने चांगले राहा बाकी आपलं चांगलं करायला आपला बाप्पा आहेच की” असा आशय लिहला आहे. वर्षभर सगळेच गणपती बाप्पाच्या आगमनाची वाट पाहत असतात. गणपती बाप्पाचं आगमन झाल्यानंतर सर्वत्रच आनंदाचे, सकारात्मक असे वातावरण पाहायला मिळते. याच पार्श्वभूमीवर ही पाटी सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

पाहा पाटी

हेही वाचा >> VIDEO: “बिग बॉस मराठी ५ चा विजेता सूरज चव्हाणच” मुंबईत मरीन ड्राईव्हवर झळकले पोस्टर; वाचा काय लिहलंय

सोशल मीडियावर mumbaicha_hulahul नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ही पाटी पोस्ट करण्यात आली आहे. यावर नेटकरी गणपत्ती बाप्पा मोरया, ओढ आगमनाची अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

मुंबईत बाप्पाची जबरदस्त एन्ट्री; एका हातात तिरंगा तर दुसरीकडे T20वर्ल्ड कपची ट्रॉफी

मुंबईतली मंडळं नेहमीच काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न करत विविध पद्धतीच्या थीमही ठेवतात. अशाच एका मंडळानं गणपती बाप्पाची मूर्ती ही ‘टी-२० वर्ल्ड कप’च्या थीमवर आधारित तयार करून घेतली आहे. गणपती बाप्पांची ही मूर्ती पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. टीम इंडियानं २०२४ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत विजेतेपद पटकावलं. भारतीय संघानं या स्पर्धेत एकही सामना न गमावता, अंतिम फेरीतही तोच ट्रेंड कायम ठेवला आणि दक्षिण आफ्रिकेला हरवून १७ वर्षांची प्रतीक्षा संपवली. टी-२० विश्वचषकामध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करीत भारतानं दुसऱ्यांदा विश्वचषकाच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे.टी-२० वर्ल्ड कप जिंकल्याचा क्षण अजूनही भारतीयांच्या मनात राहिलेला आहे, जो आपल्याला गणपती बाप्पाच्या आगमन सोहळ्यातील मूर्तीमधून दिसून आला.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganeshostav 2024 in mumbai boy showing poster of good thoughts goes viral on social media srk