Ganeshostav 2024 Viral video: मुंबईसह महाराष्ट्रात शनिवारपासून गणेशोत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. शनिवारी सकाळपासून घरोघरी व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. दरम्यान, गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी भाविकांनी मुंबईतील प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळाच्या ‘लालबागचा राजा’चं दर्शन घेण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी तेथे गणपतीचं दर्शन मिळण्याचं सोडून गर्दीचा पूर, भाविकांचा बेशिस्त, तसेच कार्यकर्त्यांची दादागिरी पाहायला मिळाली. उत्सव मंडळाचे कार्यकर्ते आणि भाविक यांच्यामध्ये होणारा वाद ही काही नवी गोष्ट नाही. हे कार्यकर्ते भाविकांना शिस्त शिकवत असतात; मात्र दुसरीकडे ओळखीच्या लोकांना ‘वेगळा न्याय’ दिला जातो. अशा प्रकारच्या घटना प्रत्येक मंडळामध्ये पाहायला मिळतात. कार्यकर्ते हे सगळं आपल्याच हातात असल्यासारखं बेदरकारपणे वागत असतात. अशा वेळी बऱ्याचदा भाविक आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद होतात, धक्काबुक्की होते
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा