Ganeshotsav 2024 mushak pray with Folded Hands: सध्या देशभरात जल्लोषात गणेशोत्सव साजरा केला जातोय. सर्वत्र उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे. बाप्पाच्या लाडक्या वाहनाबद्दल म्हणजेच मूषकाबद्दल आपण अनेक कथा ऐकल्या आहेत. तसंच गणेशोत्सवादरम्यान बाप्पाच्या मूर्तीच्या आजूबाजूला अनेकदा मूषकाचं दर्शन होतं.

गणेशोत्सवादरम्यान सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, आताही असाच एक व्हिडीओ चर्चेत आहे. या व्हिडीओत गणपती बाप्पाचं वाहन मूषक चक्क बाप्पाचा आशीर्वाद घेताना दिसला. मिरा-भाईंदर येथील गणेश पंडालमध्ये एक उंदीर मामा शिरला आणि चक्क मूर्तीच्या पाया पडताना दिसला.

Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
bollywood actors went to kareena home to meet her and kids
Video : सैफला भेटून बहिणीचे डोळे पाणावले! करण जोहर, रणबीरसह ‘हे’ बॉलीवूड कलाकार पोहोचले करीनाच्या भेटीला
School teacher dance on marathi song Mi Haay Koli song with student school video goes viral on social media
“मी हाय कोली सोरिल्या डोली न मुंबईच्या किनारी..”जिल्हा परिषद शाळेत सरांचा विद्यार्थ्यांसोबत जबरदस्त डान्स; VIDEO व्हायरल
Maharashtrachi Hasyajatra Fame prithvik Pratap share funny video with wife
Video: पृथ्वीक प्रतापला बायकोला खोचकपणे मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देणं पडलं महागात, प्राजक्ताने थेट…; पाहा मजेशीर व्हिडीओ
Heartwarming Message written by a young man on Makar Sankranti
Video : “माणूस तेव्हाच गोड बोलतो..” तरुण खरं बोलून गेला; नेटकरी म्हणाले, “१०० टक्के खरं आहे”
Video Viral poster
Video Viral : “बायकोला तिळगूळ देणे ही अंधश्रद्धा!”, हातात पोस्टर घेऊन रस्त्यावर उभा राहिला तरुण, नेटकरी, म्हणे, “भावा…”
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”

हेही वाचा… ‘आज की रात…’, भर वर्गात दोन विद्यार्थींनींचा ‘असा’ डान्स पाहून म्हणाल, कहरच…, पाहा VIRAL VIDEO

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये गणपतीचे वाहन असलेला मूषक गणपती बाप्पाची मूर्ती बसवलेल्या स्टेजच्या खाली उभा राहून हात जोडून बाप्पासमोर प्रार्थना करताना दिसला. बाप्पाला अर्पण केलेला प्रसाद घेण्याआधी मूषकाचा प्रार्थना करतानाचा हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून तो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बाप्पाचा आशीर्वाद घेतल्यानंतर हळूच बाप्पाचा आवडता प्रसाद मोदक तोंडात घेऊन उंदीर मामाने तिथून पळ काढल्याचं दुसऱ्या व्हिडीओत पाहायला मिळतंय.

हा व्हिडीओ मिरा-भाईंदर येथील साई समर्पणचा राजा पंडाल येथील आहे. @sai_samarpan_cha_raja या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून याला २०.६ मिलियन व्ह्यूज आले आहेत. “मुषक बाप्पाला प्रार्थना करतो आहे”, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे.

हेही वाचा… आली गवर आली…सोनपावली आली! चिमुकलीने गायलं गौराईसाठी गाणं, VIDEO पाहून कराल कौतुक

युजर्सच्या प्रतिक्रिया

हा व्हायरल व्हिडीओ पाहून अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एकाने कमेंट करत लिहिलं, “प्राणी देवांशी अशाप्रकारे वागतात ते मला आवडतं. माझी मांजर इतर कोणत्याही खोलीत बसणार नाही, ती नेहमी जाऊन आमचा गणपती असेल तिथेच बसते आणि ती बाप्पासमोर अशी बसते, जसं की ती लहान सिंहीण त्याच्या संरक्षणासाठीच बसलेली आहे.” तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “जिथे गणपती बाप्पा, तिथे त्याचे वाहन मुषक.”

हेही वाचा… गणपती बाप्पाचा नटखट भक्त! मूर्तीजवळ आला आणि हातातला मोदक पळवला; श्वानाचा VIRAL VIDEO एकदा पाहाच

दरम्यान, याआधीही अनेकदा बाप्पा आणि उंदराचे असे अनेक गोड व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Story img Loader