Ganpati aagaman viral video: मुंबईत गणपतीचा उत्सव थाटात होत असतो. उंच गणेशमूर्ती आणि भव्यदिव्य सजावट हे मुंबईतील गणेशोत्सवाचं मुख्य आकर्षण असतं. सर्वांनाच बाप्पाच्या भेटीची ओढ लागली आहे. यंदा ७ तारखेपासून गणपती उत्सव सुरू होईल. दहा दिवसांचा हा उत्सव सर्वांसाठी खूप खास असतो. घरोघरी बाप्पा १९ ला येतीलच पण सार्वजनीक मंडळातील गणपती बाप्पाचे आगमन सोहळे सुरू झाले आहेत. गणपती बाप्पा मोरया…, मंगलमूर्ती मोरया…चा गजर, फटाक्यांची आतषबाजी, दारात सुरेख रांगोळी, सजलेली आरास, विद्युत रोषणाईचा झगमगाट असं वातावरण काहीच दिवसांत आता सर्वत्र पाहायला मिळणार आहे. राज्यभरात गणपतीच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. काहीच दिवसांत आपल्या लाडक्या बाप्पाचं घरोघरी आगमन होणार आहे. सार्वजनिक मंडळं मंडप वगैरे बांधून मूर्तीभोवती केल्या जाणाऱ्या सजावटीला लागले आहेत.

मुंबईतही काही ठिकाणी आताच गणेशमूर्तींचे आगमन सुरू झालंय. याच पार्श्वभूमीवर बाप्पाच्या आगमन मिरवणुकीतला एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून, या व्हिडीओवर नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की नेमकं झालं काय? तर तुम्हीच हा व्हिडीओ पाहा आणि सांगा हे कितपत योग्य आहे?

Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Lalbaugcha raja 2024 darshan mumbai devotees get pushed shoved at lalbaugcha raja amid stampede like situation
लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाताय? ‘हा’ VIDEO पाहा अन् तुम्हीच सांगा चूक भाविकांची की कार्यकर्त्यांची?
Kalachauki mahaganpati video
गणपती आगमन बघायला जाताय? काळाचौकीच्या महागणपती आगमनाला काय झालं पाहा; VIDEO पाहूनच धडकी भरेल
Man wrote message for his wife in back of the car video goes viral
किती ते प्रेम! नवऱ्यानं बायकोसाठी कारच्या मागे लिहला खास मेसेज; रस्त्यावर सर्व बघतच राहिले, VIDEO पाहून कराल कौतुक
Ganeshostav 2024 shocking video man directly kicked the poor man on the street while he Falling at the feet of Lord Ganesha
“मूर्तीजवळ उभे राहून स्वतःला मालक समजू नका” कार्यकर्त्यानं रस्त्यावरच्या गरिबाला थेट लाथेनं उडवलं; VIDEO पाहून सांगा चूक कुणाची
Really last digit of your mobile number tell about your nature and personality
तुमच्या मोबाईलचा शेवटचा अंक खरंच सांगतो तुमचा स्वभाव? सोशल मीडियावर VIDEO चर्चेत
Vasai, bhayandar railway station suicide, father and son suicide, Jai Mehta, dual marriage, Bhayandar railway station, southern girl
वसई : पिता पुत्राचे रेल्वे रूळावरील आत्महत्येचे गूढ उकलले; मुलाचे प्रेमसंबंध उघड

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, तरुण-तरुणींचे गणपतीच्या आगमनाला मिरवणुकीच्या दिशेने जाताना दिसून आले. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ज्या ठिकाणाहून गणपतीची मूर्ती आणली जातेय, त्या मार्गावर प्रचंड गर्दी आहे. लोकांना साधं उभं राहायलाही जागा नाहीये. या व्हिडीओमध्ये काही तरुणी गर्दीमध्ये चेंगरल्यामुळे त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. अशात गर्दीमुळे काहीच करता येत नसल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. फेसबुक, इन्स्टा, व्हॉट्सअ‍ॅप, स्नॅपचॅट, टिष्ट्वटर अशा वेगवेगळ्या सोशल मीडीयावर आगमन सोहळ्याचे अपडेट्स टाकण्यासाठी तरुणाई प्रचंड घाई करताना दिसून आली. सर्वात आधी या आगमन सोहळ्याचे अपडेट्स कोण शेअर करत, फोटो कोण शेअर करत याविषयी काहीशी स्पर्धा तरुणाईत दिसून आली. त्यामुळे सोशल मीडीयावर अपडेट्सची घाई न करता जीव सांभाळून मोबाईलचा वापर करणे गरजेचे आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: “हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला” आजीपुढं नातीसुद्धा फिक्या; नऊवारी साडीत डोक्यावर पदर घेत आजीचा भन्नाट डान्स

फोटोसाठी कायपण

आगमन सोहळ्यानंतर लालबाग, परळ आणि चिंचपोकळी परिसरात चप्पल आणि बाटल्यांचा मोठ्या प्रमाणात खच दिसून आला. लालबागपूलाखाली सौंदर्यीकरणांतर्गत रोपे लावण्यात आली होती़ आगमन सोहळ्यादरम्यान उपस्थित तरुणाईने या दुभाजकांवरुनही उड्या मारल्याने सर्व रोपांचे नुकसान झालेले दिसून आले. आगमन सोहळ्यात बाप्पाचे फोटो आणि व्हीडीओ काढणाºया फोटोग्राफर्सचा सुळसुळाट दिसून आला. फोटो आणि व्हीडीओ काढण्यासाठी गाड्यांवर चढणे, खांब- बांबूवर चढणे, पदपथावरील बॅरिकेड्सवर चढणे, एकमेकांच्या खांद्यावर चढून फोटो काढणे अशा कसरती करताना अनेक फोटोग्राफर्स दिसून आले.

हा व्हिडीओ domumbai_ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत, एकानं कमेंट केली आहे की, “हे दृश्य मोबाईल मध्ये कैद करण्यापेक्षा डोळ्यांमध्ये कैद केले असते तर बरं झालं असतं” तर आणखी एकानं “बंद करा आता हे सगळं, आपली श्रद्धा आपल्या घरात ठेवा इतरांना त्रास नको.” अशीही कमेंट केली आहे.