Girls Dance Viral Video: गणेशोत्सव म्हटलं की, सगळीकडे उत्साह, आनंद अन् सकारात्मकतेचं वातावरण पाहायला मिळतं. बाप्पाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंतचा प्रत्येक क्षण बाप्पाचे भक्त मनमुरादपणे जगतात. बाप्पाची भक्ती, सेवा यांसह बाप्पाच्या येण्याचा आनंद आणि नंतर बाप्पाच्या जाण्याचं दुःख अनेकांच्या डोळ्यांत पाहायला मिळतं. गणोशोत्सवात मोदक, मूर्ती, सजावटीबरोबरच गणपती डान्सचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचे आपण पाहतो.

सध्या संपूर्ण राज्यभरात गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू आहे. आज गणेशोत्सवाचा पाचवा दिवस असून, सोशल मीडियावरही बाप्पाचे लाखो फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. बाप्पाच्या फोटोंसह बाप्पाच्या आगमनानिमित्त डान्स करतानाचे विविध व्हिडीओही आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या असाच एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय; ज्यात अनेक तरुणी गणपती डान्स करताना दिसत आहेत.

a young girl amazing dance on a stage Her face expression
Video : तरुणीने केला एक नंबर डान्स! चेहऱ्यावरील हावभाव आणि ऊर्जा पाहून नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
bride groom dance on Bollywood song Akelaa hai mister khilaadi miss khilaadi chaahiye
Video : अकेला है मिस्टर खिलाडी मिस खिलाडी चाहिए! नवरी नवरदेवाने केला बॉलीवूड गाण्यावर भन्नाट डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल
girl stunning dance
“आईशप्पथ, काय नाचतेय ही…”, ‘आ आंटे अमलापुरम’ गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक
Aishwarya And Avinash Narkar dance video
नारकर जोडप्याचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! Video पाहून मराठी अभिनेत्री म्हणते, “हा ग्रुप कसा जॉईन करायचा…”
Action taken against dancer and twenty customers at Panchgani hotel satara news
पाचगणीत हॉटेलमध्ये नृत्यांगना आणि वीस ग्राहकांवर कारवाई
Zee Marathi Makar Sankrant Celebration dance video
Video : ‘झुकेगा नहीं साला…’, अल्लू अर्जुनच्या गाण्यावर डॅडी अन् बाई आजीचा जबरदस्त डान्स! दोघांच्या हटके स्टाइलने वेधलं लक्ष
Sakhi Gokhale and suvrat joshi dance on shahrukh khan lutt putt gaya song
Video: सखी गोखले-सुव्रत जोशीचा पहाटे २ वाजता शाहरुख खानच्या ‘या’ गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ

तरुणींचा गणपती डान्स

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काही तरुणी एका डान्स क्लासमध्ये गणपती बाप्पा मोरया, असा जयघोष करून सुंदर डान्स करायला सुरुवात करतात. यावेळी त्या तरुणींमधील उत्साह आणि आनंद पाहून आजूबाजूला उभ्या असलेल्या इतर तरुणीही उत्साही होतात. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @STAR Boy TARUN या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास तीन लाखांहून अधिक व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. त्याशिवाय अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहेत.

हेही वाचा: ‘बाप्पा नाही फोटो महत्त्वाचा…’ बाप्पाला पाहताच दर्शन घेण्याआधीच बघ्यांनी काढले फोटो; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट

पाहा व्हिडीओ:

हेही वाचा: ‘बाप्पा तू जाऊ नको…, बाप्पाच्या विसर्जनादरम्यान श्वान झाला भावूक; VIDEO पाहून युजर्स म्हणाले, “देवा याला सुखी..”

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “वा… खूप सुंदर.” आणखी एका युजरने लिहिलेय, “फक्त उत्साह.” आणखी एकाने लिहिलेय, “एक नंबर डान्स.” आणखी एकाने लिहिलंय, “फक्त सुंदर. हे भारतातच पाहायला मिळेल.”

Story img Loader