Ganpati Bappa Morya : लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाची सर्वांना आस लागली आहे. गणेश चतुर्थीच्या दिवसाची सगळे जण आतुरतेने वाट पाहत असतात. गणरायाच्या आगमनासाठी राज्यभरातल्या बाजारपेठा या भाविकांच्या गर्दीने फुलून गेल्या आहेत. गणरायाच्या स्वागताची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मुंबईतही बाप्पाच्या आगमनाचे वेध मुंबईकरांना लागले आहेत, लालबाग-परळ याठिकाणी तर काही गणेश मंडळाचे बाप्पा मंडपात आलेही. सोशल मीडियावर बाप्पाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. ढोल ताशा, लेझीम, डान्स अशा वातावरणात मोठ्या उत्साहात बाप्पाचे आगमन होत आहे. अशातच बाप्पाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
पाहा बाप्पाने कसा केला लोकल प्रवास
हा व्हिडीओ पाहून म्हणाल बाप्पालाहीमुंबई लोकलचा प्रवास काही चुकला नाही. बाप्पाने केलेला लोकल प्रवास सध्या चर्चेचा विषय बनला आहे. कारण मुंबईकरांच्या जीवाभावाची ही लोकल आता बाप्पाच्याही जीवाभावाची झाली आहे. आपल्या लाडक्या बाप्पाने चक्क मुंबई लोकल ट्रेननं प्रवास केला आहे.
बाप्पाला मोठ्या गर्दीतून वाट काढत सीटवर बसवले आहे.सीटवर बाप्पा अगदी थाटात बसलेला दिसत आहे.या व्हिडिओत मोठ्या गर्दीतून एका सीटवर बाप्पा बसलेला दिसत आहे. बाप्पाच्या आजूबाजूला अनेक लोक बसलेले दिसत आहे. बाप्पाच्या बाजूला बसलेला एक मुलगा मूर्तीला हात लावून बसलेला आहे. धावत्या ट्रेनमध्ये बाप्पाला धक्का लागू नये म्हणून त्याने मूर्तीला हात लावला आहे. बाप्पाने भक्ताच्या घरी विराजमान होण्यासाठी मुंबई लोकलने प्रवास केला आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> Video: सीएसएमटी रेल्वे स्टेशनवर अचानक सर्वजण नाचू लागले; नेमकं काय घडलं? चकित करणारं कारण आलं समोर
‘मुंबई Matters’ या एक्स (ट्विटर)वरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून नेटकरीही बाप्पाला पाहून खूश झाले आहेत. वेगवेगळ्या प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.