Ganpati bappa visarjan viral video: सध्या देशभरात गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातोय. या वर्षी ७ सप्टेंबरला घरोघरी, गल्लोगल्ली, मोठमोठ्या मंडळांमध्ये गणरायाचं आगमन झालं आणि सुखकर्ता दु:खहर्ता म्हणत या सणाला सुरुवात झाली. गणपती बाप्पाच्या आगमनानंतर सगळ्यांना गौरीच्या आवाहनाची ओढ लागली होती. यंदा १० सप्टेंबर रोजी गौराईचं आवाहन झालं आणि १२ सप्टेंबर रोजी गौरी-गणपतींचं विसर्जन झालं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बाप्पाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत भजन म्हणत, तर नाचत-गात भक्तजन अगदी मग्न होऊन जातात. पाणावलेल्या डोळ्यांनी, मनात असंख्य भावना घेऊन बाप्पाचं विसर्जन पार पाडलं जातं. आपण अगदी लहानपणापासून बाप्पाचं विसर्जन पाहत आलोय. पण, आता सोशल मीडियावर गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा एक असा अनोखा व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून तुम्ही नक्कीच अवाक व्हाल.

हेही वाचा… “मॅडम तुम्ही…”, विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षिकेने केला डान्स; VIDEO VIRAL होताच नेटकरी म्हणाले…

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल झालेल्या या व्हिडीओत बाप्पाच्या विसर्जनाची एक अनोखी पद्धत आपल्याला पाहायला मिळेल. या व्हिडीओत बाप्पाचं एका विहिरीत विसर्जन केलं जात आहे. विसर्जनासाठी एका माणसानं हातांत बाप्पाची मूर्ती पकडली आहे. थोड्या अंतरावर उभं राहून त्यानं बाप्पासह थेट विहिरीत उडी मारली अन् अशा प्रकारे त्या माणसानं गणपती बाप्पाचं विसर्जन केलं.

विसर्जनाच्या वेळी आजूबाजूला गावकरी जमलेले दिसत होते. @anitarcr या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून, “बरोबर ना! असे असावे विसर्जन बाप्पाचे. जिथे पर्याय नसतो, तिथे बाप्पा असतो आपल्या भक्तांबरोबर. बाप्पा चुकले, काही क्षमा असावी…” असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. तर या व्हिडीओला तब्बल २८.५ दशलक्ष व्ह्युज आले आहेत.

हेही वाचा… “काका एकदम खतरनाक…”, बाप्पाच्या विसर्जनाच्या मिरवणूकीत काकांनी धरला जबरदस्त ठेका; Video पाहून नेटकरी म्हणाले…

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करीत प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत. एका युजरनं कमेंट करीत लिहिलं, “जर मूर्तीला वरून फेकलं असतं, तर तो गणरायाचा अपमान झाला असता. पण, त्यानं शेवटपर्यंत मूर्ती हातातून सोडली नाही जोपर्यंत मूर्तीला पाण्याचा स्पर्श होत नाही. पर्याय बरेच असतात फक्त ते आपल्याला शोधता आले पाहिजेत आणि अजमावता आले पाहिजेत.” तर दुसऱ्यानं “आतापर्यंत बाप्पाचं विसर्जन करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग मी पाहिला आहे”, अशी कमेंट केली. तर अनेकांनी “गणपती बाप्पा मोरया”, असा एकच जयघोष करणाऱ्या कमेंट्स केल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganpati bappa visarjan viral video different way of ganesha visarjan went viral on social media dvr