‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ या घोषात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रु दाटतात. ११ दिवस ज्याची मनोभावे पुजा केली जाते, ज्याच्या आगमनाची वर्षभर आपण आतुरतेने वाट पाहतो त्याला निरोप देताना साहजिकच दाटून येते. बाप्पालाही असेच दाटून आले तर ? बाप्पाने या आपल्या लाडक्या भक्तांसाठी पाठवलेले पत्र सध्या प्रत्येक गणेश भक्ताच्या मोबाईलमध्ये फिरते आहे.
त्याला जाऊन तीन दिवस झाले आहेत पण आपल्या गावाला गेलेल्या बाप्पांना इतक्या लगेच आपल्या भक्तांचा विसर कसा पडेल म्हणून वर्षभर पुरेल अशी आठवण बाप्पांनी सगळ्यांना दिली आहे. आणि ही आठवण म्हणजेच बाप्पांचे पत्र. गणेशगल्लीचा गणपती म्हणजेच मुंबईचा राजाने आपल्या लाडक्या गणेशभक्तांसाठी लिहलेले हे पत्र आहे. खर तर या पत्राची मुळ संकल्पना आहे ती ओमकार धुरी यांची. पण जणू त्यांच्या लेखणीतून बाप्पाच आपल्याशी संवाद साधत अल्याचे वाटते. यात बाप्पांनी प्रत्येकाला समजूतीच्या चार गोष्टी सांगितल्या आहेत आणि चांगल्या कामासाठी त्याने सगळ्यांचे कौतुकही केले आहे. बाप्पाचे हे पत्र अगदी जसेच्या तसे तुमच्यासाठी..
प्रिय भक्तांनो,
ओळखलात का मला तुमचा लाडका मुंबईचा राजा. पत्र लिहण्यास कारण कि मी सुखरुप पोहचलो. आपण ११ दिवस केलेली धमाल मज्जा आताच आई बाबांना सांगितली..खरे सांगयचे तर तुमचा निरोप घेताना माझ्या डोळ्यातही अश्रू होते, पावसाच्या सरीत तुम्हाला ते समजत नव्हते..
तुम्ही सर्वांनी केलेली मनोभावे सेवा आणि हो, मुंबईची सेवा करणा-आ ख-या मानक-यांना आरतीचा मान दिल्याबद्दल तुमचे खुप कौतुक वाटते.. आणि हो., एक सांगायचे राहिलेच पोलीसांचा सन्मान करा तुमचे खरे विघ्नहर्ता तेच आहेत.. चला तर मग पुन्हा एकदा त्याच जोषात, त्याच जल्लोषात तयारीला लागा मी ९० वर्षांत पदार्पण करणार आहे. पुन्हा येईन नवीन रुपात तुमच्या भेटीला आपल्याच गणेशगल्लीत !
तुमचाच, मुंबईचा राजा