Viral Video: सध्या संपूर्ण देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह साजरा केला जात असून आज गणेशोत्सवाचा पाचवा दिवस आहे. आतापर्यंत दीड आणि अडीच दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन करण्यात आले असून सोशल मीडियावर यादरम्यानचे अनेक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत, ज्यावर लाखो व्ह्यूज आणि लाइक्सही पाहायला मिळत आहेत. अनेकदा आपण पाहतो की, बाप्पाच्या विसर्जनाच्या दिवशी अनेक जण खूप भावूक होतात. पण, आता समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये चक्क श्वान भावूक झालेला पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्वान हा अनेकांच्या घरात पाळला जाणारा प्राणी आहे. त्यामुळे त्यालादेखील घरातील इतर सदस्यांप्रमाणे वागणूक दिली जाते. त्याचे सर्व लाड, हट्ट पुरवले जातात. श्वान जितका प्रामाणिक असतो तितकाच तो भावूकही असल्याचे अनेकदा आपण पाहिले असेल. आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवर त्याचा जीव असतो. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये असाच एक सुंदर क्षण पाहायला मिळत आहे.

श्वान झाला भावूक (Dog Viral Video)

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका घरातील मंडळी बाप्पाला विसर्जनासाठी घेऊन जात असल्याचे दिसत आहेत. यावेळी श्वान तिथे येतो आणि दोन्ही पाय वर करून बाप्पाचे दर्शन घेतो. यावेळी श्वानाचे डोळे पाणावतात. श्वानाचे हे भावूक मन पाहून नेटकरीही अवाक् झाले आहेत. सध्या हा सुंदर क्षण दाखवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @streetdogsofbombay या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास ८० हजारांहून अधिक व्ह्यूज आणि अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. त्याशिवाय अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहेत.

हेही वाचा: “रुप तुझे पाहून…” श्रीरामांच्या रुपातील बाप्पाच्या मूर्तीचा सुंदर VIDEO व्हायरल, नेटकरी करतायत कौतुक

पाहा व्हिडीओ:

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “बाप्पा, या श्वानाला नेहमी आनंदी ठेवा.” आणखी एका युजरने लिहिलेय, “हा क्षण खूप गोड आहे.” आणखी एकाने लिहिलेय, “देवाचा आवडता भक्त.” आणखी एकाने लिहिलंय, “देव तुझं नेहमी रक्षण करो.”

दरम्यान, अशाप्रकारचे अनेक सुंदर क्षण दाखवणारे व्हिडीओ सोशल मीडियावर यापूर्वीही व्हायरल झाले आहेत. यापैकी एका व्हिडीओमधील एक श्वान बाप्पाचा मोदक खाताना दिसला होता, तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये एक श्वान बाप्पाच्या मिरवणुकीत सहभागी झाला होता.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganpati viral video the dog became emotional during bappas visarjan sap