Garba In New York Viral Video : वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक असलेला नवरात्रीचा नऊ दिवसांचा उत्सव २६ सप्टेंबरपासून सुरू झाला आणि तो ५ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. दोन वर्षानंतर हा उत्सव धुमधडाक्यात साजरा करता येणार असल्याने प्रत्येकामध्ये नवरात्रौत्सवासाठीचा उत्साह दिसून येतोय. नवरात्रोत्सवात गरबा-दांडिया खेळायची एक वेगळीच क्रेझ तरुणाईमध्ये असते. ही क्रेझ थेट न्यूयॉर्कपर्यंत येऊन पोहोचली आहे. होय, न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर महिलांनी गरब्यावर ठेका धरलाय. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलाय. व्हिडीओ पाहून गरब्याची थेट न्यूयॉर्कमध्ये पोहोचलेली पाहून सारेज जण आश्चर्य होऊ लागले आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन महिला गरब्याच्या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. न्यूयॉर्कमधल्या या दोन महिलांपैकी एकीने पारंपारिक वेशभूषा परिधान केलेली दिसत आहे. तर दुसऱ्या महिलेने वेस्टर्न कपड्यांमध्ये ट्रेडिशनल लूक देण्याचा प्रयत्न केलाय. या दोन्ही महिला गरब्याच्या ‘रमती आवे’ या गाण्यावर अगदी बेधुंद होऊन डान्स करताना दिसत आहेत. या दोघींच्या गरबा स्टेप्स इतक्या जबरदस्त आहेत की ते पाहून तुम्ही सुद्धा थिरकू लागाल.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

आणखी वाचा : Navratri 2022 : मुंबई लोकल ट्रेनमधला गरबा पाहिलात का? हा VIRAL VIDEO तुम्हाला सुद्धा थिरकण्यास भाग पाडेल

न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवरील रस्त्यावर या दोघी महिला गरबा करताना दिसत आहेत. या दोघी गरबा करत असताना आजुबाजूने जाणारे विदेशी नागरिकही त्यांना पाहण्यासाठी जमा झालेले दिसत आहेत. विदेशात राहूनही या दोघींनी गरबा अगदी परफेक्ट करताना दिसत आहेत.

आणखी वाचा : मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर तरूणांनी केला गरबा डान्स; आनंद महिंद्रा म्हणाले, “गुजरातमधून माझा विरोध…

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : Navratri 2022 : माजी पालकमंत्री आदिती तटकरे यांचा गरबा डान्स; पाहा Viral Video

सध्या देशात सगळीकडे नवरात्रीचा माहौल सुरू असताना हा व्हिडीओ मात्र प्रचंड व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये गरबा करणाऱ्या महिलांची नावे मिस्त्री हेली आणि ध्वनी देसाई अशी आहेत. यातली ध्वनी देसाई ही मुळची मुंबईकर असून ती स्वतः एक डान्सर आहे. तर मिस्त्री ही ब्लॉगर असून दोघी सोशल मीडियावर भरपूर सक्रिय असतात. नवरात्री निमित्ताने दोघींनी मिळून हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. पहाटे २ वाजता हा व्हिडीओ शूट केला असल्याचं या पोस्टमध्ये सांगितलं आहे. व्हिडीओ बनवण्याचा मूळ प्लॅन सकाळी होता पण रात्री जास्त छान दिसेल हे लक्षात घेऊन पहाटे २ वाजता हा डान्स व्हिडीओ शूट केला असल्याचं पोस्टमध्ये लिहिलंय.

आणखी वाचा : इराणमध्ये मुस्लिम महिला अचानक केस का कापू लागलेत? कारण…

हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की आतापर्यंत या व्हिडीओला ९५ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर साडे तीन हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय.

Story img Loader