Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये कचरा उचलणारा चिमुकला राष्ट्रगीत ऐकताच सावधान स्थितीत राहतो. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. संस्कार किंवा चांगल्या गोष्टी या फक्त पुस्तकात मिळत नाही तर आपल्या आजुबाजूला या गोष्टी बघून माणूस शिकतो. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (Garbage picker boy stands like a statue position as national anthem is heard watch viral video)

कचरा उचलणारा चिमुकला राष्ट्रगीत ऐकताच सावधान स्थितीत उभा राहिला

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की कचरा उचलणाऱ्या मुलाला अचानक देशाचे राष्ट्रगीत ऐकू येते. कदाचित ते राष्ट्रगीत एखाद्या शाळेतील असावेत. राष्ट्रगीत ऐकताच चिमुकला कचऱ्याची पिशवी खाली ठेवतो आणि सावधान स्थितीत उभा राहतो. देशाविषयी त्याचा आदर पाहून तुम्हीही भारावून जाल. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की या चिमुकल्यासमोरुन राष्ट्रगीत सुरू असताना एक दुचाकीचालक जातो पण तो थांबत नाही पण हा चिमुकला मात्र थांबतो. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी या चिमुकल्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

हेही वाचा : VIDEO : ऑनलाइन मुलाखतीत ओठ हलवून बोलण्याचा करत होता दिखावा, दुसरी व्यक्ती देत होती उत्तरे, मुलाखत घेणाऱ्याने नक्कल करताना पकडले

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : “माऊली निघाले पंढरपूर…” विठ्ठलाच्या भेटीला निघालेल्या वारकऱ्यांसाठी आनंद महिंद्रा यांचं मराठीतून खास ट्वीट

digital_harikesh या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर लिहिलेय, “जितके वेळा त्याला सलाम करू तितके कमी आहे.”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “संस्कारच आपली ओळख करून देतो” तर एका युजरने लिहिलेय, “ज्या मुलाला खरंच शिक्षणाची गरज आहे, तो मुलगा रस्त्यावर आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “डोळ्यातून नकळत पाणी आलं जय हिंद जय भारत” एक युजर लिहितो, ” आपल्या राष्ट्रासाठी प्रेम निर्माण करण्यासाठी संस्कार आणि शिक्षण या दोन महत्त्वाच्या गोष्टी असतात.” अनेक युजर्सनी या चिमुकल्याचे मनभरून कौतुक केले आहेत. काही युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत तर काही लोकांनी त्याच्या उज्वल भविष्यासाठी प्रार्थना केली आहेत.