Viral Video: आईच्या गर्भातच बाळावर संस्कार होतात. गर्भसंस्कारचा अर्थच हा आहे की गर्भातील बाळावर चांगले संस्कार करणे. याची सुरुवात गर्भधारणेच्या आधीपासूनच होते. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये लवकरच आई होणाऱ्या महिलेने गर्भातच तिच्या बाळाला किती सुंदर संस्कार दिले आहेत हे कळून येतय. जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमध्ये नेमकं आहे तरी काय…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गर्भातच आईचे संस्कार

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत एका गर्भवती महिलेच्या हातात दोन फोन असतात आणि त्यावर ती दोन वेगळी गाणी लावते आणि आपल्या नवऱ्याला तिच्या पोटाचं निरीक्षण करायला सांगते. पहिल्या फोनवर ती ‘आज की रात मजा हुस्न का’ हे गाणं लावते आणि नवऱ्याला विचारते की, पोटाच्या इथे काही होतंय का, यावर नवरा म्हणतो की नाही, काहीच होत नाहीय. यानंतर ती दुसऱ्या फोनवर हनुमान चालिसा लावते आणि नवऱ्याला सांगते की आता माझ्या पोटाजवळ काही हालचाल होतेय का बघ, यावर नवऱ्याला आश्चर्याचा धक्काच बसतो, कारण त्या महिलेच्या पोटाची हालचाल होत असते.

हेही वाचा… “गरीब होणं सगळ्यात मोठा गुन्हा आहे”, हातगाडीचा जागीच झाला चुराडा अन् एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं, पाहा VIDEO

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ @lay_bhari_official या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला “हनुमान चालिसा ऐकताच आईच्या गर्भात मूल कसं हालचाल करतंय बघा” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. या व्हिडीओला तब्बल एक मिलियन व्ह्यूज आले आहेत.

हेही वाचा… “काय नवरा बनणार रे तू”, डान्स करता करता तोल गेला अन्…, नवरदेवाची एक चूक पडली महागात, पाहा VIDEO

युजर्सच्या प्रतिक्रिया

लवकरच आई होणाऱ्या या महिलेचा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “गर्भातदेखील बाळाला गर्भसंस्कार फार महत्त्वाचे असतात ते खरंच”, तर दुसऱ्याने “खूपच छान” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “कोणाची नजर नाही लागली पाहिजे”, तर अनेकांनी “जय बजरंग बली”, “जय श्रीराम”, “जय हनुमान” अशा कमेंट्स केल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Garbh sanskar in pregnancy pregnant woman video viral after child in womb moves after she played hanuman chalisa dvr