Garlic Matlab Adrak Viral Memes: सोशल मीडिया आणि पाकिस्तान… ही दोन अशी ठिकाणे आहेत जी सोशल मीडियाच्या ट्रोल आर्मीसाठी दररोज मजेशीर विषय पुरवत राहतात. शेजारील देश पाकिस्तान दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने अडचणीत येत असतो. कधी देशाचे खेळाडू असं काही करतात ज्यामुळे संपूर्ण देशाची बदनामी होते, तर कधी इथले नेते असं काही बोलतात ज्यामुळे त्यांना ट्रोल केलं जातं. यात आता पाकिस्तानचे मंत्र फवाद चौधकी यांचं नाव आलंय. पाकीस्तानी मंत्री फवाद चौधरी यांचा “गार्लिक म्हणजेच आले” असा दावा करणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय आणि हा व्हिडीओ पाहून नेटिझन्सना हसू आवरणं अवघड होऊ लागलंय. यावरून सोशल मीडियावर वेगवेगळ्या विनोदी मीम्सचा अक्षरशः महापूर आलाय. हे मीम्स वाचून तुम्ही पोट धरून हसाल, हे मात्र नक्की.

खरं तर पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी ‘गार्लिक म्हणजेच आले’ असं वर्णन करून स्वतःची चांगलीच कोंडी केली आहे. इतकंच नव्हे तर संपूर्ण पत्रकार परिषद संपेपर्यंत हे मंत्री महोदय ‘गार्लिक म्हणजेच आले’ या दाव्यावर ठाम राहिले. आता लोक यावरून फवाद चौधरी यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करू लागले आहेत. पाकिस्तानच्या या मंत्र्याच्या ज्ञानावरही युजर्सनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

पत्रकार नायला इनायत यांनी हा मजेदार व्हिडीओ त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत २ लाख २२ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर ६ हजारांहून अधिक लोकांनी त्याला लाइक केले आहे. तर १ हजार ४०० पेक्षा जास्त लोकांना हा व्हिडीओ रिट्वीट करण्याचा मोह काही आवरता घेता आला नाही.

पाकिस्तानमध्ये महागाईच्या मुद्द्यावरून माहिती व प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत एका प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणताना दिसत आहेत, ” कांदा आणि गार्लिक… म्हणजे जे गार्लिक आहे… गार्लिकला म्हणतात लसूण… नाही आले म्हणतात… माफ करा गार्लिक म्हणजे आले…. तर आल्याचे भावही कमी झाले आहेत… पाकिस्तानी मंत्र्याच्या या व्हिडीओवर आता नेटकऱ्यांनी विनोदाचा वर्षाव करण्यास सुरूवात केलीय. हा व्हिडीओ पाहून प्रत्येकजण या ‘लसूण म्हणजे आले’ या विनोदाचा आनंद लुटताना दिसून येत आहेत. चला तर मग हा व्हिडीओ पाहूया…

आणखी वाचा : ‘दुसऱ्या ग्रहाच्या’ रहस्यमय ढगांनी झाकले अर्जेंटिनाचे आकाश, आश्चर्यकारक दृश्य पाहून लोक घाबरले, पाहा VIRAL VIDEO

दरम्यान, पाकीस्तानी मंत्री फवाद चौधरी यांनी केलेलं हे वक्तव्यावर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या क्रिएटीव्हीला जागं करत वेगवेगळे विनोद आणि मीम्स शेअर करण्यास सुरूवात केलीय. या नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंट करत लिहिलं की, “गार्लिक म्हणजे आलं नाही तर लसूण असतं…. अशाच एका यूजरने कमेंट करत म्हटलंय, “कुणीतरी व्हिडीओमध्ये लसूण म्हटलंय, पण त्यानंतरही मंत्री आलं म्हणत आहेत.” दुसऱ्या आणखी एका यूजरने तर थेट लसणाचा फोटो शेअर करत चौधरी यांना विचारलं, “हे काय आहे? अन्यथा, वर्गाबाहेर उभे रहा.” काही नेटकऱ्यांनी तर या मंत्र्यांच्या ज्ञानावर प्रश्न उपस्थित करत “कोणत्या शाळेत शिकायला होते?” असा प्रश्न केलाय. हे सर्व मीम्स आणि विनोदी कमेंट्स पाहून तुम्हाला हसू आवरता येणार नाही हे मात्र नक्की.

आणखी वाचा : VIRAL : अबब, भिकारी महिलेने मंदिराला दुसऱ्यांदा दान केले दहा हजार रूपये…

इथे पाहा काही मजेदार मीम्स आणि विनोदी कमेंट्स…

पाकीस्तानी मंत्री फवाद चौधरी हे अनेकदा भारताविरोधात वक्तव्य करत असतात. भारताकडून आपल्याला कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचा दावा त्यांनी नुकताच केला होता. भारत देश पाकिस्तानशी स्पर्धा करू शकत नाही, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर फवाद चौधरी यांनी असेही म्हटले होते की, “पाकीस्तान देशाला जर कोणाकडून धोका असेल तर तो आतल्या आत म्हणजेच पाकिस्तानकडून आहे.”

Story img Loader