Gas Stove Explosion Video: काळानुसार अनेक गोष्टी बदलल्या आहेत. आधी चुलीवर होणारा स्वयंपाक आता गॅसवर होऊ लागलाय. त्यामध्येही आधी लोक स्टीलच्या शेगड्या वापरायचे; पण आता ग्लास कोटिंगच्या शेगड्या घराघरात पाहायला मिळतात. ग्लास शेगडीचा वापर किंवा ग्लास शेगडीची खरेदी मोठ्या प्रमाणात होते. पण, ही शेगडी वापरताना थोडी काळजी घ्या; अन्यथा असं काहीतरी घडू शकतं. एक तरुण किचनमध्ये बटर पनीर बनवत होता. पण, तेवढ्यात शेगडीचा स्फोट झाला. आणि पुढे काय घडलं हे आता तुम्हीच पाहा. जर तुम्हीदेखील आपल्या घरी काचेची शेगडी वापरत असाल, तर सावध व्हा. या व्हिडीओचा शेवट पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

गेल्या काही काळात किचन इक्विपमेंटमध्ये बरेच बदल झाले आहेत. आधी पाटा वरवंटावर वाटप तयार केलं जायचं पण आता मिक्सरचा वापर केला जातो. भाज्या कापण्यासाठी लोकं चाकू वापरायचे पण आता विविध प्रकारचे कटर वापरले जातात. तोच बदल गॅस स्टोव्ह किंवा ज्याला आपण शेगडी म्हणतो त्यामध्ये झालेला दिसतोय. आधी लोकं स्टीलच्या शेगड्या वापरचे पण आता ग्लास कोटिंगच्या शेगड्या घराघरात पाहायला मिळतात. अर्थात या शेगड्या दिसायला फारच सुंदर असतात. पण त्या वापरताना थोडी काळजी घ्या, अन्यथा असं काहीतरी घडू शकतं.

महिला किचनमध्ये जेवण करत होती तेवढ्यात शेगडीचा स्फोट झाला. आणि पुढे काय घडलं हे आता तुम्हीच पाहा. या व्हिडीओचा शेवट पाहून तुम्ही देखील थक्कच व्हाल.हा स्फोट इतका दमदार होता की शेगडीची काच फुटली.या काचेचे तुकडे संपूर्ण घरात पसरले होते. सुदैवानं या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही. पण जर का एखादा तुकडा डोळ्यांत वगैरे गेला असता तर आणखी मोठं नुकसान झालं असतं. असो, पण जर तुम्ही देखील आपल्या घरी काचेची शेगडी वापरत असाल तर सावध व्हा.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> PHOTO: याला म्हणतात बायकोचा धाक! “प्रिय बायको तुझा विश्वास…” रिक्षाच्या मागे लिहिलं असं काही की रस्त्यावर सर्व बघतच राहिले

हा व्हिडीओ सोशल मीडियावरtejalmodi454 या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. नेहमी गॅस वापरणारे आपण त्याबाबत पुरेसे जागरूक असतोच, असे नाही. मात्र, कधीतरी गॅसबाबत काही झाले, तर आपण तो दुरुस्त करण्यासाठी, त्यासंबंधीच्या जाणकार व्यक्तीला बोलावतो. परंतु, खरं तर गॅस हा वर्षातून किंवा दोन वर्षांतून एकदा तरी तपासून घ्यायला हवा. कारण- तो कुठे लिकेज होत नाही ना हे ठरावीक दिवसांनी तपासणे आवश्यक आहे; अन्यथा मोठा अपघात होऊ शकतो.