अंकिता देशकर

Gautam Gambhir Vs Virat Kohli: मागील वर्षीच्या आयपीएल दरम्यान, भारताचे आजी- माजी स्टार खेळाडू विराट कोहली गौतम गंभीर आमने सामने आले होते. मैदानातच या दोघांचं भांडण इतकं तापलं होतं की त्यानंतर अजूनही त्या वादाच्या काही ठिणग्या सोशल मीडियावरून समोर येत असतात. अलीकडेच लाइटहाऊस जर्नलिझमला गौतम गंभीरने विराटच्या चाहत्यांना हातवारे करत चुकीची वागणूक दिल्याचे दाखवणारे दोन व्हिडीओ आढळले. यापैकी एका व्हिडिओमध्ये लोक कोहली कोहली असं ओरडत होते तर एका व्हिडिओमध्ये भारताविरोधी घोषणा देत होते. गौतम गंभीरने या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना आपण भारतविरोधी घोषणांवर प्रतिक्रिया दिल्याचे एएनआयला स्पष्ट केले. पण त्यांनतर दुसरा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यासंदर्भातील तपासात गौतम गंभीरने दिलेले स्पष्टीकरण कसे खोटे आहे हे सिद्ध होत आहे.

Navri Mile Hitlarla
Video: ‘नवरी मिळे हिटलरला’मधील एजे-लीलाच्या रोमँटिक सीनचे ‘असे’ झाले शूटिंग; पाहा व्हिडीओ
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
Prakash Ambedkar
“RSS ने बाबासाहेबांच्या हिंदू कोड बिलाला विरोध केलेला”, प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल; म्हणाले, “भाजपा लोकांचं लक्ष वळवण्यासाठी…”
shahrukh khan Abhishek bachchan dance with children video viral
आराध्या-अबरामचा मंचावर, तर विद्यार्थ्यांबरोबर शाहरुख खान अन् अभिषेक बच्चनचा जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
What Rahul Gandhi Said?
Rahul Gandhi : राहुल गांधी मागणीवर ठाम, “अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला आहे, त्यांनी राजीनामा…”
Rahul Gandhi BJP MP Ruckus
Rahul Gandhi Video : “लाज वाटत नाही का? दादागिरी करता…”; जखमी भाजपा नेत्याला पाहायला गेलेल्या राहुल गांधींना खासदारांनी सुनावलं
MVA Andolan
MVA Agitation : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हाती घेत मविआचं आंदोलन; जयंत पाटील म्हणाले,”षडयंत्र…”
beed sarpanch murder case in maharashtra assembly session
बीड: सरपंच हत्या प्रकरणाचे विधानसभेत पडसाद, आमदार संदीप क्षीरसागर यांचं उद्विग्न भाषण; म्हणाले, “बीडमध्ये चॉकलेट खाल्ल्याप्रमाणे…”,

काय होत आहे व्हायरल?

ट्विटर यूजर Sidha_memer व्हिडिओमध्ये मूळ ऑडिओ असल्याचा दावा करत व्हायरल व्हिडिओ शेअर केला आहे.

इतर वापरकर्ते देखील व्हायरल व्हिडिओ शेअर करत आहेत आणि दावा करत आहेत की तो खरा आहे.

व्हायरल क्लिपमध्ये लोक ‘भारत तेरे टुकडे होंगे… इंशाल्लाह इन्शाअल्लाह’ अशा घोषणा देताना दिसत आहेत.

तपास:

गौतम गंभीरच्या प्रतिक्रियेबाबत सोशल मीडियावर पोस्ट आहेत का हे तपासण्यासाठी आम्ही ट्विटर आणि गुगलवर कीवर्ड सर्च करून आमचा तपास सुरू केला. आम्हाला सोशल मीडिया प्रोफाइलवर अपलोड केलेले काही व्हिडिओ आढळले, जिथे गर्दी ‘कोहली कोहली’ अशा घोषणा देताना ऐकू येत आहे.

आम्हाला इन्स्टाग्रामवर व्हिडिओ सापडला, जो मूळ ऑडिओ वापरून अपलोड करण्यात आला होता आणि व्हिडिओचे क्रेडिट @furqannagra यांना देण्यात आले होते. फुरकान नागरा यांचे अकाउंट खाजगी होते. आम्ही वापरकर्त्याला इन्स्टाग्रामवर मेसेज पाठवला आहे, परंतु अद्याप कोणतेही उत्तर प्राप्त झालेले नाही.

त्यानंतर आम्हाला ‘@xTripti’ या मोठ्या प्रमाणावर फिरणाऱ्या व्हिडिओवर एक वॉटरमार्क सापडला ज्यामध्ये भारतविरोधी घोषणा होत्या. आम्ही Twitter वर ‘@xTripti’ हा शोध शब्द म्हणून वापरला.

आम्हाला आढळले की ‘@xTripti’ खाते अस्तित्वात नाही.

त्यानंतर आम्हाला Rofl Modi 2.0 या ट्विटर अकाऊंटचे एक ट्विट सापडले, ज्याने @xTripti वापरकर्त्याने व्हिडिओ एडिट केल्याची पुष्टी केली आणि तिने स्वतः याची पुष्टी केली. त्यानंतर आम्ही तपासले की ट्विटर वापरकर्ता तृप्तीने तिचे ट्विटर खाते निलंबित करण्यापूर्वी व्हिडिओ एडिट केल्याची पुष्टी केली होती. यासाठी आम्हाला तिच्या ट्विटचा आर्काइव्ह व्हर्जन सापडला.

https://archive.is/m928O

आम्हाला ट्विटर वापरकर्ता निब्राझ रमजानचे एक ट्विट देखील आढळले.

वापरकर्त्याने सामन्यादरम्यान उपस्थित असलेल्या त्याच्या चुलत भावांचा हवाला दिला आणि व्हिडिओ काढताना भारतविरोधी घोषणा दिल्या नाहीत असे सांगितले.

त्यानंतर आम्ही स्टेडियममधील भारतविरोधी घोषणांचा ऑडिओ शोधला. आम्ही Google वर ‘भारत तेरे टुकडे होंगे… इंशाल्लाह इन्शाल्लाह’ हे कीवर्ड वापरले आणि आठ वर्षांपूर्वी अपलोड केलेल्या JNU मधील असल्याचा दावा केलेल्या व्हिडिओसह ऑडिओ सापडला. आठ वर्षांपूर्वी टीव्ही गुजरातीद्वारे अपलोड केलेल्या पुढील व्हिडिओमध्ये २५ सेकंदांनंतर गौतम गंभीरच्या व्हिडिओमधून तेच भारतविरोधी घोषणा ऐकू येतात.

याचा निष्कर्ष असा आहे की आशिया चषकादरम्यान चाहत्यांनी विराट कोहलीच्या नाव घेत घोषणाबाजी केली होती आणि व्हिडिओ क्लिपमध्ये भारतविरोधी घोषणा नाहीत. मात्र, गौतम गंभीरने भारतविरोधी घोषणांवर प्रतिक्रिया दिल्याचे सांगत आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.

निष्कर्ष: ज्या व्हायरल व्हिडिओमध्ये गौतम गंभीर गर्दीला अयोग्य हावभाव करताना दिसला होते त्यात विराट कोहलीच्या नावाचे नारे आहेत आणि जर काही भारतविरोधी घोषणा असतील तर ते व्हिडिओमध्ये ऐकू आले नाही.

Story img Loader