Latest News Gautami Patil : सबसे कातील गौतमी पाटील विश्वचषकाच्या अंतिम सामन्याच्या दिवशीही चर्चेत राहिली. बैलाचा वाढदिवस असो किंवा तिच्या कार्यक्रमात झालेला गदारोळ, खुर्च्यांची तोडफोड असो ती कायमच चर्चेत असते. मात्र विश्वचषकाची फायनल एकीकडे आणि दुसरीकडे स्टेजवर गौतमीचा कच कच कांदा गाण्यावर नाच हे दृश्य गोंदियात पाहण्यास मिळालं. क्रिकेट प्रेमींच्या नजरा विश्वचषकातल्या अंतिम सामन्यात काय होतं? त्याकडे होत्या. तर गौतमीच्या कार्यक्रमात मॅचचं खास स्ट्रिमिंग करण्यात आलं.
झाडीपट्टी म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात गौतमी पाटीलचा नाच आणि भारत ऑस्ट्रेलिया सामन्याचं प्रक्षेपण एकाचवेळी करण्यात आलं. मंचावर एकीकडे गौतमी पाटील थिरकत होती आणि दुसरीकडे मोठ्या पडद्यावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या विश्वचषक सामन्याचा थरार रंगला होता. या कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. शिट्ट्या आणि टाळ्या वाजवत लोक सामन्याला आणि गौतमींच्या अदांना प्रतिसाद देत होते. मंचावर गौतमी थिरकते आहे आणि मोठ्या स्क्रिनवर सामना लावण्यात आला आहे असं दृश्य रविवारी गोंदियात दिसलं.
पुन्हा राष्ट्रवादी गाण्यावर गौतमीचा नाच
गौतमी पाटील आणि गोंधळ असं समीकरण नेहमीच पाहायला मिळतं. मात्र गोंदियातील कार्यक्रमात असा कुठलाही गोंधळ पाहायला मिळाला नाही. याबद्दल प्रतिक्रिया देत गौतमी म्हणाली,”कधीतरी गोंधळ होत असतो मात्र प्रत्येक वेळेस होत नाही आजचा कार्यक्रम खूप छान झाला आणि गोंदियात आल्यावर खूप छान वाटले”. गोंदियात गौतमीने ‘राष्ट्रवादी पुन्हा’ या गाण्यावर डान्स केला होता.
गौतमी पाटील काय म्हणाली?
गोंदियामध्ये आज मला कार्यक्रम करुन खूप छान वाटलं. या कार्यक्रमात काहीही गडबड झाली नाही. खूप छान वाटलं, मला कायमच प्रेम मिळतं तसं आजही मला प्रेम मिळालं. मी तीनच गाण्यांवर नाचते या आरोपात काही तथ्य नाही. मी तीन गाण्यांवर नाचते असं लोकांना वाटतं कारण लोक तेवढीच गाणी बघतात. असं गौतमी पाटीलने म्हटलं आहे.