Gautami Patil Childhood Pic: ‘सबसे कातील गौतमी पाटील’ म्हणत महाराष्ट्रातल्या तरुणाईने लावणी डान्सर गौतमी पाटीलला अक्षरक्षः डोक्यावर घेतलं आहे. कायम सर्वत्र चर्चेत असते. गौतमीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नृत्याची आवड जपत गौतमीने सर्वांच्या मनावर राज्य केलं आहे. गौतमी हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. संपूर्ण महाराष्ट्रात गौतमीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. एवढंच नाही तर, मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध सेलिब्रिटी म्हणून देखील गौतमीने स्वतःची ओळख तयार केली आहे. मात्र लहान असताना गौतमी कशी दिसायची असा प्रश्न चाहत्यांना नक्कीच पडला असणार. गौतमी पाटीलचा लहान असतानाचा एक फोटो समोर आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गौतमीचा लहानपणीचा फोटो व्हायरल

गौतमी पाटीलचा लहानपणीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता अख्ख मार्केट जाम करणारी गौतमी लहानपणीही तितकीच गोंडस दिसत होती. आतापर्यंत तुम्ही गौतमीला लावणी करताना साडीमध्ये पाहिलं असेल, मात्र या फोटोमध्ये गौतमी ही एका जांभळ्या रंगाच्या जाळीदार ड्रेसमध्ये दिसत आहे. विना मेकअपही गौतमी तेवढीच सुंदर दिसत आहे. गौतमीला लहानपणापासून नृत्याची आवड होती. दरम्यान अकलूज लावणी महोत्सवात तिने पहिल्यांदा लावणी केली. आणि तिला तिथे पाचशे रुपये मानधन मिळालं होतं. यानंतर गौतमीने या क्षेत्रात भविष्य घडवायचं ठरवलं. आणि इथूनच गौतमीचा खरा प्रवास सुरु झाला.

पाहा गौतमीचा लहानपणीचा फोटो –

हेही वाचा – “लोक आम्हाला गौतमी पाटीलचे व्हिडीओ दाखवून…” तमाशा कलावंतांनी मांडली खंत, म्हणाले, “तिचे चाळे…”

घरच्या परिस्थितीमुळे आपण नृत्याकडे वळल्याचे गौतमी सांगते. सुरुवातीला ती बॅकडान्सर म्हणून काम करायची.  त्यानंतर गौतमीने पुणे आणि कोल्हापूरमध्ये जास्तीत जास्त शो केले. प्रेक्षकांकडून तिला दिवसेंदिवस अधिक प्रेम मिळू लागलं. तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. त्यामुळे गौतमी महाराष्ट्रभर लोकप्रिय झाली.