Gautami Patil Viral Video: प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलचा एका कार्यक्रमात कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली होती. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी याची दखल घेत पोलिसांना तातडीने कारवाईचे निर्देश दिले होते. याप्रकरणावर गौतमी पाटीलने सुरुवातीला काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती, मीडियासमोरही गौतमीने येऊन माझी मनस्थिती नाही समजून घ्या इतकंच सांगितलं होतं. पण आता एका युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत गौतमीने सदर प्रकरणानंतरचा भीषण अनुभव पहिल्यांदाच सांगितला आहे. गौतमीने अक्षरशः रडतच आपण कसे खचून गेलो होतो याबाबत उघडपणे भाष्य केले आहे. इतकंच नाही तर व्हिडीओ व्हायरल करणाऱ्याचा सुद्धा चांगलाच समाचार घेतला आहे.
… म्हणून कपडे बदलतानाचा Video आईला पाठवला
@theoddEngineer या युट्युब चॅनेलवर दिलेल्या मुलाखतीत गौतमीने व्हायरल व्हिडीओ जेव्हा पहिल्यांदा पाहिला तेव्हाची स्थिती सांगितली आहे. ती म्हणते, “जेव्हा हा व्हिडीओ समोर आला एक क्षण मला काय करावं कळत नव्हतं पण मग मी आधी हा व्हिडीओ माझ्या आईलाच पाठवला. याचं कारण म्हणजे इतर कोणी तिला हा व्हिडीओ पाठवला असता तर ते बघून तिला सहन झालं नसतं म्हणून तिला कल्पना देण्यासाठी मी स्वतः तिला हा व्हिडीओ पाठवला.”
गौतमीने हा व्हिडीओ काढणाऱ्या व्यक्तीची सुद्धा चांगलीच शाळा घेतली, ती म्हणते, “त्याला माझी प्रसिद्धी पाहावली नाही की माझे शो बंद करायचे होते, नेमक्या काय कारणासाठी त्याने हा प्रकार केला मला माहीत नाही पण यातून त्याची मानसिकता किती खराब आहे हे दिसून येते, मी चुकले पण त्यानंतर नवी सुरुवात करण्यासाठी मी अगदी नवी साडी शिवण्यापासून तयारी केली, पण काहींना हे बघवलं नाही.”
Viral Video वर गौतमीची पहिली भावुक प्रतिक्रिया
गौतमी पुढे सांगते की, “जेव्हा व्हायरल व्हिडिओचं प्रकरण झालं त्यानंतरच्या शोमध्ये मनात धाकधूक होती कोणी काही कमेंट करेल का असं वाटत होतं पण मला शोच्या आयोजकांनी, माझ्या सह डान्स करणाऱ्या अन्य मुलींनी आणि माझ्या महाराष्ट्रातील चाहत्यांनी धीर दिला, त्यातही पहिल्या एंट्रीला खूप घाबरले होते पण मग मी प्रेक्षकांना खुश करायचं आहे हे एकच मनात ठेवून एंट्री घेतली व स्टेज दणाणून सोडला.”