Gautami Patil Clothes Changing Viral Video: गौतमी पाटील हे नाव मागील काही महिन्यात महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पोहोचले आहे.सुरुवातीला गौतमीच्या अश्लील नृत्यावरून तर नंतर सामाजिक, राजकीय, ऑनलाईन- ऑफलाईन स्तरावर होणाऱ्या टीकांमुळे गौतमी सदैव चर्चेत राहिली. या चर्चांमध्ये अनेकांनी गौतमीचीच चूक दाखवली होती पण त्यांनतर २४ फेब्रुवारीला असा काही प्रकार घडला की टीकाकारही गौतमीच्या बाजूने उभे राहू लागले. गौतमीचा कपडे बदलतानाच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणी आता पुणे पोलिसांना मोठे यश हाती आले आहे. प्राप्त माहितीनुसार हा व्हिडीओ काढणाऱ्या एकाला पोलिसांनी नुकतेच ताब्यात घेतले आहे.

गौतमीचा व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातून या मुलाला ताब्यात घेण्यात आले. गौतमीने केलेल्या तक्रारीवरून राज्य महिला आयोगानेदेखील यासंदर्भात तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

Vishal Gawli News
Vishal Gawli : “विशाल गवळीने माझ्या मुलीला जवळ ओढलं, तिचं तोंड दाबलं आणि…”, पीडितेच्या आईने सांगितला दोन वर्षांपूर्वीचा ‘तो’ प्रसंंग
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
dhananjay munde valmik karad santosh deshmukh murder
Dhananjay Munde: “हे असले बॉस?” धनंजय मुंडेंचं हातात पिस्तुल घेतलेलं रील शेअर करत अंजली दमानियांची पोस्ट; ‘त्या’ व्हिडीओचाही समावेश!
Ranveer Allahbadiya
गोव्याच्या समुद्रात बुडत होते प्रसिद्ध युट्यूबर अन् त्याची गर्लफ्रेंड; IPS अधिकाऱ्याच्या कुटुंबाने वाचवले जीव, थरारक प्रसंग सांगत म्हणाला…
tiger attack on cow
VIDEO: शिकार करो या शिकार बनो! ताडोबामध्ये वाघानं पर्यटकांसमोरच केला गायीवर हल्ला; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?
Viral video Jan Seva Kendra (mini-bank) in Uttar Pradesh's Saharanpur
Robbery in UP Bank : चोरानं समोर येऊन बंदूक रोखून धरली, तरी बँक कर्मचारी फोनवर निवांत बोलत होता! अखिलेश यादव यांची पोस्ट व्हायरल!
in pune mobile thief dragged youth and bite his hand for mobile at hadapsar area
मोबाइल चोरणाऱ्या चोरट्यांनी पादचारी तरुणाला फरफटत नेले, विरोध करणाऱ्या तरुणाचा हाताचा चावा
chota dadiyal tiger latest news in marathi
Video : ताडोबातील ‘‘अजीम-ओ-शान शहंशाह” कोण..?

गौतमी पाटील व्हायरल व्हिडीओ प्रकरण काय? (Gautami Patil Viral Video)

२४ फेब्रुवारीला पुण्यात एका कार्यक्रमाच्या वेळी गौतमी पाटीलचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ कोणीतरी शूट करून व्हायरल केला. हा व्हिडीओ गौतमी पर्यंत पोहोचताच मग तिच्याच ग्रुपमधील एका मुलीने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती

गौतमी पाटीलची लोकप्रियता पाहता तिला बदनाम करण्यासाठी तिचा व्हिडीओ शूट करण्यात आला असल्याची चर्चा होती. याप्रकरणी गौतमीने एका युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांची कानउघडणी केली होती. “तुमचं काही जात नाही पण मला लोकं बोलतात, तुमच्याही घरी, आई- बहिणी असतील ना, मग हे असं काम करताना त्यांचा विचार मनात आला नाही का?” असा प्रश्न गौतमीने केला होता. शिवाय हा व्हिडीओ आपण सर्वात आधी आपल्या आईला पाठवून तिला कल्पना दिली होती हे म्हणताना गौतमीचे डोळे पाणावले होते.

हे ही वाचा<< “कपडे बदलतानाचा Video आईला पाठवला अन्…” गौतमी पाटीलने रडून पहिल्यांदाच ‘तो’ प्रसंग सांगितला

गौतमी पाटील आपल्या नृत्यात अश्लील हावभाव करत असल्याचा आरोप वारंवार होत असतानाही त्याचा तिच्या लोकप्रियतेवर परिणाम झालेला नाही. गौतमीचा ‘घुंगरू’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Story img Loader