Gautami patil : महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असते. तरुणाईमध्ये लोकप्रिय असलेल्या गौतमी पाटीलचे अनेक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सहसा डान्स करताना गौतमी ही नऊवारी नेसते पण तुम्ही कधी गौतमीला साडी नेसून डान्स करताना पाहिले आहे का? सध्या गौतमीचा एक डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहे. या डान्स व्हिडीओमध्ये गौतमी सहावारी साडी नेसली आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचा व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की गौतमीने पिवळ्या रंगाची सहावारी साडी नेसली आहे. ती स्टेजवर डान्स करताना दिसत आहे आणि स्टेजसमोर असलेले हजारो प्रेक्षक तिचा डान्स बघताना दिसत आहे. काही लोकं तिचा डान्स मोबाईलच्या कॅमेरात शुट करत आहे. गौतमी पिवळ्या सहावारी साडीत खूप सुंदर दिसत आहे. गौतमी नेहमी नऊवारी नेसून डान्स करते पण तिला असे सहावारीत सुंदर डान्स करताना पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

हेही वाचा : Mumbai Vadapav : मुंबईचा चीज वडापाव खाल्ला का? व्हायरल व्हिडीओ पाहून तोंडाला पाणी सुटेल

ashok_kharat4611 या अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून अशोक खरात हे गौतमी पाटीलचे मॅनेजर आहे. त्यांच्या इन्स्टाग्रामच्या बायोमध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे. त्यांच्या या अकाउंटवरुन गौतमी पाटीलच्या डान्सचे अनेक व्हिडीओ आणि गौतमीबरोबर त्यांचे अनेक फोटो शेअर केलेले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gautami patil dance in sahavari saree video goes viral on instagram social media ndj