Gautami Patil Viral video : महाराष्ट्राला आपल्या अदांनी घायाळ करणाऱ्या गौतमी पाटीलने यंदा दहीहंडीनिमित्ताने मुंबई आणि ठाण्यात हजेरी लावली होती. यावेळी तिच्या डान्स, अदांबरोबर एका गोष्टीची सर्वाधिक चर्चा रंगली होती. गौतमीने मागाठाणे येथील आमदार प्रकाश सुर्वे यांच्या भव्य दहीहंडी उत्सवाला हजेरी लावली होती. यावेळी गौतमीचे जंगी स्वागत करण्यात आले. दहीहंडी राहिली बाजूला; पण गौतमीला पाहण्यासाठीच बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. पाव्हणं जेवलं काय, तुझ्यासाठी आले वनात कान्हा रे अशा गाण्यांवरील गौतमीचे जोरदार ठुमके, दिलखेचक अदा, चेहऱ्यावरील उत्साह पाहून गोविंदांनी एकच जल्लोष केला. गौतमीच्या जोरदार ठुमक्यांबरोबर तिच्या आणखी एका गोष्टीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गौतमीच्या जोरदार ठुमक्यांबरोबर ‘या’ गोष्टीने वेधले लक्ष

गौतमीच्या डान्सबरोबर यंदा तिच्या ब्लाऊजनेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले. गौतमीने खास दहीहंडी सेलिब्रेशनसाठी एक आकर्षक ब्लाऊज परिधान केला होता. गौतमीने राधा-कृष्णाच्या फोटोनं बनविलेला खास पिवळ्या रंगाचा ब्लाऊज आणि लाल रंगाची नऊ वारी साडी परिधान केली होती. तिचा हा लूक आता चांगलाच चर्चेत आला आहे. खासकरून तिचा ब्लाऊज आकर्षणाचा विषय ठरला.

Viral Video : ९ थर लावणार इतक्यात…; जय जवान पथकाचे विश्वविक्रमाचे स्वप्न यंदाही अपूर्णचं, Video मध्ये पाहा नेमकं चुकलं काय?

गौतमीला तोड नाही, युजर्सच्या कमेंट्स

गौतमी पाटीलने स्वत:च्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यावर तिच्या चाहत्यांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. गौतमीला तोड नाही, आय लव्ह यू गौतमी, गौतमी पाटीलची बिग बॉसच्या घरात होणार वाईल्ड कार्ड एन्ट्री अशा वेगवेगळ्या कमेंट्स तिच्या अनेक चाहत्यांकडून करण्यात येत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gautami patil desingner blouse special look for dahi handi 2024 magathane prakash surve dahi handi borivali video viral sjr