Viral Video : मुंबई म्हटलं की समुद्राची चर्चा होणारच आणि समुद्राची चर्चा करताना मरीन ड्राईव्ह हे लोकप्रिय ठिकाण कसे विसरता येईल. मरीन ड्राईव्ह हे समुद्रकिनारी असलेले सुंदर ठिकाण आहे. येथे समुद्रकिनाऱ्याच्या कठड्यावर बसण्यासाठी अनेक जण गर्दी करतात. आता मरीन ड्राईव्ह हे कलाकारांसाठी उत्तम कट्टा ठरला आहे. अनेक कलावंत मरीन ड्राईव्हला आपली कला सादर करताना दिसून येतात.सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चक्क दोन तरुण सुंदर लावणी नृत्य सादर करताना दिसत आहे. यांची लावणी पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की दोन तरुण सुंदर लावणी करत आहे. चंद्रा या लोकप्रिय मराठी गाण्यावर ते लावणी करताना दिसत आहे. या दोघांच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हीही थक्क व्हाल. गौतमी पाटील असो की अमृता खानविलकर या दोघींनाही मागे टाकेल अशी लावणी हे दोघे तरुण सादर करताना दिसत आहे. त्यांना बघण्यासाठी अनेक तरुण मंडळी आजुबाजूला जमलेले दिसत आहे. हे लावणी नृ्त्य पाहून तुम्हीही त्यांचे चाहते व्हाल.

a young girl amazing dance on a stage Her face expression
Video : तरुणीने केला एक नंबर डान्स! चेहऱ्यावरील हावभाव आणि ऊर्जा पाहून नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
bride groom dance on Bollywood song Akelaa hai mister khilaadi miss khilaadi chaahiye
Video : अकेला है मिस्टर खिलाडी मिस खिलाडी चाहिए! नवरी नवरदेवाने केला बॉलीवूड गाण्यावर भन्नाट डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल
Paaru
Video: “आदित्यसरांचं नाव घेते माझ्या…”, पारूने आदित्यसाठी घेतला उखाणा; सावली, लीला व तुळजाने केले कौतुक
Video : an old couple dance on angaro ka ambar sa song in pushpa movie
Video : क्या बात! आज्जी आजोबांनी ‘पुष्पा’ गाण्यावर केला भन्नाट डान्स, नेटकरी म्हणाले, “जोडी असावी तर अशी..”
Sakhi Gokhale and suvrat joshi dance on shahrukh khan lutt putt gaya song
Video: सखी गोखले-सुव्रत जोशीचा पहाटे २ वाजता शाहरुख खानच्या ‘या’ गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ
a child girl presents amazing Bharatanatyam classical Indian dance video goes viral
Video : चिमुकलीने सादर केले अप्रतिम भरतनाट्यम, चेहऱ्यावरील हावभाव अन् डोळ्यांची हालचाल…; Video एकदा पाहाच
Video of womans simple act of kindness amasses 24 million views
इंटरनेटवरील सर्वात सुंदर व्हिडीओ! एकटाच खेळत होता चिमुकला, तरुणीच्या प्रेमळ कृतीने जिंकले नेटकऱ्यांचे मन

हेही वाचा : मुंबई लोकलमधून महिलांचा जीवघेणा प्रवास; VIDEO पाहून येईल अंगावर काटा

हा व्हिडीओ rajdancer2021 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन सादर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आपली कला सादर करण्यासाठी मरीन ड्राईव्ह खूप छान ठिकाण आहे आणि प्रत्येक कलाकाराला तिथे खूप छान प्रतिसाद देतात. कलेचा आदर करतात. प्रत्येक रविवारी नक्की भेट द्या. वेगवेगळ्या कला बघा आणि प्रत्येकाचा आदर करा कलेला दाद द्या .धन्यवाद”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “किती सुंदर लावणी करताय दोघेपण” तर एका युजरने लिहिलेय, “गौतमी पाटीलही तुमच्यापुढे मागे राहिली” आणखी एका युजरने लिहिलेय, “मुंबईमध्ये नेहमीच तुम्हाला चांगला प्रतिसाद मिळेल आणि मरीन ड्राइव्ह सारख्या ठिकाणी तर मस्तच. विशेषत: शनिवार आणि रविवार”

मुंबईला ‘ड्रीम सिटी’ म्हटले जाते. दरवर्षी लाखो तरुण आपली स्वप्ने साकार करण्यासाठी मुंबईत येतात. मुंबईही कलावंतांसाठी सुद्धा ओळखली जाते. अनेक तरुण मंडळी त्यांच्या कलेच्या जोरावर येथे येऊन नशीब आजमावतात.

Story img Loader