Viral Video : गौतमी पाटील ही महाराष्ट्रातील एक लोकप्रिय नृत्यांगणा आहे. तिचे नृत्य बघण्यासाठी दुरवरुन लोक येत असतात. तिचे महाराष्ट्रात लाखो चाहते आहेत. तरुणाईमध्ये ती विशेष लोकप्रिय आहे. सोशल मीडियावर तिच्या कार्यक्रमातील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चक्क एक तरुण चाहता गौतमीसाठी साडी नेसून आलाय. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
अल्पावधीत गौतमीने खूप लोकप्रियता मिळवली. तिची एक झलक पाहण्यासाठी लोकं गर्दी करतात. यामुळेच तिच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी पाहायला मिळते. गौतमी पाटीलचे असंख्य चाहते आहेत ते नेहमी तिच्यासाठी काही तरी खास करण्याचा प्रयत्न करतात. असाच एक तरुण गौतमी पाटीलला खुष करण्यासाठी तिच्या कार्यक्रमात चक्क साडी नेसून आला.
हा व्हायरल व्हिडीओ गौतमी पाटीलच्या एका कार्यक्रमातील आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की गौतमी पाटील स्टेजवर डान्स करत आहे आणि तिच्यासमोर उभे असलेले हजारो चाहते तिचा डान्स बघताना दिसत आहे. चाहत्यांच्या गर्दीत तुम्हाला एक तरुण दिसेल. त्याने चक्क साडी नेसली आहे आणि साडी नेसून तो गर्दीत डान्स करताना दिसतोय. गौतमीला जेव्हा हा तरुण साडी नेसून डान्स करताना दिसतो तेव्हा गौतमी पाटील स्टेजवरुन त्याचे कौतुक करते आणि त्याला विचारते, “केस सुद्धा लावलेत का?” पुढे ती सर्व चाहत्यांना त्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवण्यास सांगते आणि तिच्या सांगण्यावरुन चाहते या तरुणासाठी टाळ्या वाजवताना दिसतात.
हेही वाचा : VIDEO : आजीसमोर तरुणीही फेल! केला भन्नाट खानदेशी डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल
officiall_gautami941 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर कॅप्शन लिहिलेय, “गौतमीसाठी चाहता नेसून आला साडी” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “काय लोकं वेडी झाली आहेत गौतमीसाठी” तर एका युजर्सनी लिहिलेय, “गौतमी पाटीलचा मी खूप मोठा चाहता आहे” काही लोकांना हा व्हिडीओ आवडला नाही. एका युजरने लिहिलेय, “त्यामुळे आपले नुकसान होत आहे. शिक्षणाकडे लक्ष राहत नाही. लहान लहान पोरं बिघडतात. शिक्षणाकडे लक्ष द्यावं ही कळकळीची विनंती आहे. शिक्षण हे वाघीनीचं दूध आहे.”