Gautami Patil Lavani Viral Video: बीड (Beed) जिल्ह्यातील राजुरी शिवारात एका वाढदिवसाच्या कार्यक्रमात गौतमी पाटीलच्या लावणीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी गौतमीचा डान्स पाहण्यासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. गौतमीचा डान्स सुरू असताना, गौतमीचं वेड लागलेले चाहते शेकडोच्या संख्येत स्टेजवर चढले आणि एकच गदारोळ मजला. यावेळी उपस्थितांनी माध्यमांना सांगितलेल्या माहितीनुसार गौतमी नाचत असताना स्टेजवर दगडफेक सुद्धा करण्यात आली होती. गौतमी पाटीलच्या या कार्यक्रमामुळे बीड-परळी राष्ट्रीय महामार्गावर तब्बल १ तास ट्रॅफिक जाम झाल्याचे सुद्धा समजत आहे.

प्राप्त माहितीनुसार राष्ट्रवादीचे कार्यकर्ता व स्थानिक बारमालक रोहन गायकवाडच्या वाढदिवसानिमित गौतमी पाटीलच्या लावणीचं आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात झालेल्या गर्दीत अनेकजण झाडावर चढून गौतमीला बघत होते. दगडफेक झाल्याने हा कार्यक्रम अर्ध्यातच बंद करण्यात आला होता. पण मुळात बीड येथे ग्रामपंचायत निवडणूक असल्याने सध्या आचारसंहिता लागू आहे, असं असताना गौतमीच्या डान्ससाठी नक्की कोणी परवानगी दिली असाही प्रश्न समोर येत आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

गौतमी पाटीलवर दगडफेक

PHOTOS: गौतमी पाटीलच्या एका शोचं मानधन ऐकून व्हाल थक्क; खऱ्या आयुष्याबद्दल गौतमी म्हणते, “मी खूप..”

दरम्यान, अश्लील डान्स व हावभाव यामुळे चर्चेत आलेली गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात धिंगाणा होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी मिरज येथील कार्यक्रमात गौतमीच्या लावणीला प्रचंड गर्दी झाली होती, ज्यावेळी चेंगराचेंगरी होऊन एकाचा संशयास्पद मृत्यूही झाला होता. यानंतर एका कार्यक्रमात गौतमीवर काठ्या फेकून मारण्यात आल्या होत्या, यावेळी गौतमीला गर्दीतून बाहेर काढण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आले होते.

Story img Loader