Gautami Patil Love Story: गौतमी पाटीलवर कितीही टीका होत असली तरी तिच्या सौंदर्याची चर्चा सर्वत्र आहे. गौतमीचा स्टेजवर दिसणारा अंदाज जेवढा नेटकऱ्यांना तेवढाच तिचा छान पंजाबी सूट घातलेला सोज्वळ लुकही प्रेक्षकांना आवडतो. अनेकांना तर गौतमीच्या अशा लुकवर तू एकदम ‘बायको’ दिसतेस अशाही कमेंट केल्या आहेत. याच चाहत्यांना गौतमीच्या खाजगी आयुष्याविषयी जाणून घेण्यास प्रचंड रस असतो. आजवर गौतमीने सुद्धा काही मुलाखतींमध्ये आपले आई- वडील, शिक्षण यावर अनेकदा भाष्य केलं आहे. पण आता पहिल्यांदाच गौतमी आपल्या लग्नाच्या प्लॅनविषयी बोलताना पाहायला मिळाली. गौतमीने आपल्या लव्ह स्टोरीकडून असलेल्या अपेक्षांविषयी सुद्धा भाष्य केलं आहे.

युट्युबर @theoddengineer या चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत गौतमीला तिच्या लग्नाविषयी विचारण्यात आलं. ज्यावर तिने हो मला लग्न करायचं आहेच अशी प्रतिक्रिया दिली. पुढे ती म्हणते की, “मी लहानपणी मुलींच्या शाळेत होते, बाबा सोडून गेल्यावर घरी कोणीच पुरुष नव्हता, ना वडील ना भाऊ, ना नातेवाईक. यानंतर पण कधीच कोणत्या पुरुषाशी वैयक्तिक असा संबंध आला नाही. अशावेळी आता घरातल्या जबाबदाऱ्यांचा निदान अर्धा वाटा उचलण्यासाठी तरी एक पुरुष आयुष्यात असावा अशी इच्छा आहे. म्हणून मला लग्न करायचंय. “

पुढे गौतमीने आपल्या होणाऱ्या नवऱ्याबाबतच्या अपेक्षा सुद्धा सांगितल्या. ती म्हणते की, “मला पैसे, बंगला, प्रतिष्ठा कशाची गरज नाही पण येईल त्या परिस्थितीत माझी साथ देणारा माझा जोडीदार हवा आहे. त्यामुळे असा मुलगा जेव्हा मिळेल तेव्हा मी लग्नाचा विचार करेन”

हे ही वाचा<<“कपडे बदलतानाचा Video आईला पाठवला अन्…” गौतमी पाटीलने रडून पहिल्यांदाच ‘तो’ प्रसंग सांगितला

गौतमीने अलीकडेच तिच्या कुंकू लावून व्हायरल झालेल्या फोटविषयी सुद्धा स्पष्टीकरण देत सांगितले की, बघा आपण जे काम करतो त्यात प्रेक्षकांची आवड जपायची असते. त्यांना तसा लुक आवडतो म्हणून तसा केला होता. मी अजून २५ वर्षाची आहे आणि माझं लग्न झालेलं नाही पण मला लग्न करायची इच्छा आहे.”

Story img Loader