Gautami Patil Mother Photo: गौतमी पाटीलच्या वडिलांनी काही दिवसांपूर्वी माध्यमांसमोर येऊन लेकीची पाठराखण केली होती. तसेच मी गौतमी व तिच्या आईला सोडलेले नाही असेही विधान त्यांनी केले होते. गौतमी पाटीलचे कुटुंब, आडनाव सध्या चर्चेत असतानाच इंस्टाग्रामवर गौतमीच्या बालपणीचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये पहिल्यांदाच गौतमीची आई पाहायला मिळत आहे. या फोटोच्या कमेंटबॉक्समध्ये अनेकांनी गौतमी आपल्या आईची हुबेहूब कॉपी दिसत असल्याचे म्हटले आहे. तर वडिलांच्या व्हिडीओवरूनही काहींनी गौतमीला सुनावले आहे.
गौतमी पाटीलचा तिच्या आईबरोबर व्हायरल होणारा फोटो हा @Official_Gautami941 या अकाउंटवर शेअर करण्यात आला होता. हे गौतमीचेच अधिकृत अकाउंट असल्याचे म्हटले जाते पण अद्याप यावर ब्लु टिक मिळालेली नाही. या अकाउंटवरील तब्ब्ल ८ लाखाहून अधिक फॉलोवर्ससह गौतमी व तिच्या आईचा फोटो शेअर करण्यात आला होता. याला कॅप्शन देत ती म्हणाली होती की, “माझं जग, मी आणि माझी आई”.
गौतमी पाटील व तिच्या आईचा फोटो पाहून अनेकांनी चांगल्या कमेंट केल्या आहेत. मुख्य म्हणजे एरवी गौतमीच्या फोटोवर टीका करणाऱ्यांनी सुद्धा “तुम्ही दोघी खूप छान दिसताय”, “एकमेकींना असं सांभाळून राहा” कमेंट केल्या आहेत. तर काहींनी “गौतमी तू वाटल्यास आम्हाला दोन शिव्या दे पण तू तुझ्या वडिलांचा म्हातारपणात सांभाळ करायला हवास” असेही कमेंट करून लिहिले आहे.
गौतमी पाटीलच्या आईचा पहिला फोटो व्हायरल
हे ही वाचा<< गौतमी पाटीलचे वडील कोण आहेत? मूळ नाव व काम काय? म्हणाले, “आज गौतमीचा आदर वाटतो पण..”
दरम्यान, गौतमी पाटीलच्या वडिलांच्या व्हिडिओवर अद्याप गौतमीने कोणतेही उत्तर दिलेले नाही. आडनावाच्या वादावर मात्र माझं आडनाव पाटील आहे तर पाटीलच लावणार अशी भूमिका तिने माध्यमानं बोलून दाखवली होती.