Gautami patil new viral video: सबसे कातील गौतमी पाटील’ म्हणत महाराष्ट्रातल्या तरुणाईने लावणी डान्सर गौतमी पाटीलला अक्षरक्षः डोक्यावर घेतलं आहे. कायम सर्वत्र चर्चेत असते. गौतमीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नृत्याची आवड जपत गौतमीने सर्वांच्या मनावर राज्य केलं आहे. गौतमी हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. संपूर्ण महाराष्ट्रात गौतमीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. एवढंच नाही तर, मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध सेलिब्रिटी म्हणून देखील गौतमीने स्वतःची ओळख तयार केली आहे. अशातच गौतमीचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये गौतमी चक्क अहिराणी भाषेत बोलली आहे. तिची ही अहिराणी भाषा ऐकून तुम्हीही तिचं कौतुक कराल.

अहिराणी ही मराठीची प्रमुख बोलीभाषा. नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या चार जिल्ह्यातली. धुळे, नंदुरबार व जळगाव परिसराला खानदेश म्हणतात. अहिराणीत जोडशब्द जास्त प्रमाणात आढळतात. उदाहरणार्थ- तुन्हा, मन्हा, त्यास्ना, आम्ना, तुम्हना, धल्ला, धल्ली, ग्यात, सम्द, बर्हादनी, बठ्ठ, व्हऊ, आदी. म्हणून अहिराणीला खानदेशी असेही म्हटले जाते. अहिराणी ही फारच गोड भाषा आहे; यामुळेच अहिराणीतील शिव्याही गोड वाटतात!राज्याच्या धुळे, जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ही भाषा बोलली जाते. या पट्ट्यात प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील हिचा जन्म झाला. त्यामुळे जन्माने धुळेकर असलेल्या गौतमी पाटील देखील मोठ्या अभिमानाने अहिराणी भाषा बोलते. तिच्या अहिराणी भाषेत बोलतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
punha kartvya aahe
Video: “तुम्ही कितीही दूर…”, वसुंधराने केला सासूचे मन जिंकण्याचा निर्धार; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत नवीन वळण, पाहा प्रोमो
Navri Mile Hitlarla
Video: ‘नवरी मिळे हिटलरला’मधील एजे-लीलाच्या रोमँटिक सीनचे ‘असे’ झाले शूटिंग; पाहा व्हिडीओ
Nana Patekar Aamir Khan Video viral
Video: मैत्री असावी तर अशी! नाना पाटेकर व आमिर खानचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, नेटकरी साधेपणाचं करताहेत कौतुक
a bride took an oath before marriage and said she will never say sorry to her husband
“लग्नानंतर कधी भांडण झालं तर मी कधीच नवऱ्याला सॉरी म्हणणार नाही” नवरीने लग्नाआधीच घेतली शपथ, पाहा मजेशीर Video
Rahul Gandhi BJP MP Ruckus
Rahul Gandhi Video : “लाज वाटत नाही का? दादागिरी करता…”; जखमी भाजपा नेत्याला पाहायला गेलेल्या राहुल गांधींना खासदारांनी सुनावलं
Bigg Boss Marathi Season 5 Fame Yogita Chavan Dance video viral
Video: “बाई हा काय प्रकार”, ‘बिग बॉस मराठी’ फेम योगिता चव्हाणचा डान्स पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया, म्हणाले…

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘होऊ दे धिंगाणा’ या कार्यक्रमाला नृत्यांगणा गौतमी पाटीलने हजेरी लावली. या कार्यक्रमात गौतमी पाटीलने स्पर्धकांना मार्गदर्शन केलं. त्यानंतर या अहिराणी भाषा बोलून जुन्या आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अभिनेता सिद्धार्थ जाधव करतोय.

या कार्यक्रमात गौतमी पाटील अहिराणी भाषेत म्हणाली,’मी आठवीपर्यंत धुळ्यात होते. मला मोजकी भाषा येते. मी आज ‘होऊ दे धिंगाणा-३’ या कार्यक्रमात आले आहे. मला खूप चांगलं वाटत आहे. मला मानसन्मान मिळतोय, त्यामुळे खूप चांगलं वाटत आहे. खूप छान वाटत आहे. आज सर्व कलाकारांसमोर उपस्थित आहे. हे माझं भाग्य समजते. तुमच्या सर्वांचे आभार मानते’.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDOE: “खतम, टाटा बाय बाय” लग्नात अचानक पोहोचली नवरदेवाची एक्स गर्लफ्रेंड; भर मंडपात नवरी अन् गर्लफ्रेंडमध्ये तुफान राडा

गौतमी पाटीलने अहिराणी भाषा बोलल्यानंतर सिद्धार्थ जाधवने प्रतिक्रिया दिली. गौतमी पाटीलला उगाच ‘कातील’ म्हणत नाहीत, सिद्धार्थ म्हणाला. त्यानंतर गौतमी पाटील देखील लाजली. गौतमी पाटीलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे

Story img Loader