Gautami Patil Real Father: गौतमी पाटील हे प्रकरण मागील वर्सभरात महाराष्ट्रात चांगलंच चर्चेत राहिलं आहे. आधी अश्लील नृत्य मग कार्यक्रमातील राडे, कपडे बदलतानाचा व्हायरल व्हिडीओ आणि आता गौतमीच्या पाटील आडनावावरून पुन्हा एकदा वाद सुरु झाला आहे. अशातच आता गौतमीच्या वडिलांनी लेकीची पाठराखण करत पहिल्यांदा माध्यमांना प्रतिक्रिया दिलेली आहे. जर आपण गौतमीच्या सुरुवातीच्या मुलाखती पहिल्या असतील तर आपल्याला माहित असेलच की याच व्यक्तीवर गौतमीने मारहाणीचे आरोप लावले होते. पण तरीही आता गौतमीच्याच बाजूने उभे राहिलेले तिचे वडील आहेत तरी कोण, त्यांचे मूळ नाव काय व काय करतात याविषयी माहिती पाहूया…
गौतमी पाटीलच्या वडिलांचे नाव- गाव काय?
गौतमी पाटीलच्या वडिलांचे नाव रवींद्र बाबुराव पाटील (नेरपगारे) असे असून ते सध्या जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वेळोदे या गावी राहतात. हेच गौतमीचे मूळ गाव आहे. तिच्या वडिलांच्या माहितीनुसार, जन्मानंतर काही दिवस गौतमी सुद्धा कुटुंबासह इथेच राहात होती पण नंतर ती मामाच्या गावाला म्हणजेच धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा इथे आईबरोबर राहायला गेली. तर गौतमीने यापूर्वी एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे गौतमीच्या जन्माचं आधीच आई व वडील वेगळे झाले होते, आठवीत असताना गौतमीने पहिल्यांदा वडिलांना पहिले होते.
गौतमीने केलेल्या आरोपानुसार, तिचे वडील म्हणजे रवींद्र पाटील यांना दारूचं व्यसन होतं. त्यामुळे पत्नीशी वाद व्हायचे यावेळी त्यांच्याकडून मारहाण झाल्याचे सुद्धा गौतमीने स्वतः सांगितले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, गौतमीचे आई वडील विभक्त झाल्यावर वडिलांनी पुण्यात एकाठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी केली होती. यादरम्यान रवींद्र पाटील यांच्या पालकांचे निधन झाले व त्यावेळी गौतमी व तिची आई अंत्यसंस्कारांना आली नाही. या रागातून मागील साधारण २० वर्षे गौतमीची आई व वडील विभक्तच राहिले आहेत. सध्या गौतमीच्या वडिलांकडे त्यांच्या मूळ गावी घर व काही शेती आहे. याच शेतीतून ते आपला उदरनिर्वाह करतात.
गौतमी पाटीलने वडिलांवर केले होते ‘हे’ आरोप
हे ही वाचा<< गौतमी पाटीलने स्पष्ट सांगितला ‘फ्युचर प्लॅन’! म्हणाली, “आज मला फसवून जे…”, Video वर फॅन्स म्हणाले, “तू सोसलंय…”
गौतमी पाटीलचे वडील म्हणतात, “आदर वाटतो पण…”
दरम्यान, ‘एबीपी माझा’शी बोलताना गौतमीच्या वडिलांनी गौतमीच्या आडनावावर होणाऱ्या टीकेला खोडून काढले आहे, तिचे आडनाव पाटील आहे तर पाटीलच राहणार असेही ते म्हणाले. शिवाय गौतमीची प्रगती बघून तसेच तिने आपल्या कलेच्या जोरावर जे नाव केले आहे ते पाहून आनंद होतो व आदर वाटतो पण तितकंच वाईटही वाटतं असेही रवींद्र पाटील यांनी सांगितले आहे.