Gautami Patil Viral Video: गौतमी पाटील हे नाव कधी कौतुकाने कधी टीकेने, काहींकडून रागाने, काहींकडून प्रेमाने, कोणत्या ना कोणत्या कारणाने सदैव चर्चेत असतेच. महाराष्ट्रात सध्या गौतमीच्या डान्ससह नावाची इतकी हवा आहे की त्याला तोडच नाही. याच गौतमी पाटीलच्या कुटुंबाची कहाणी जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक होते. काही दिवसांपूर्वी माध्यमांसमोर येत गौतमीचे वडील रवींद्र पाटील यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले होते. आपण गौतमी व तिच्या आईला सोडलेलं नाही त्या मायलेकीच आपल्याला सोडून गेल्या असा दावा त्यांनी केला होता तर गौतमी आपल्याकडे परत यावी तिने आपल्याला एकदा पप्पा म्हणून हाक मारावी अशी इच्छा असल्याचे रवींद्र पाटील यांनी बोलून दाखवले होते. त्यानंतर गौतमीच्या अकाऊंटवरून गौतमीच्या आईचा एक तरुणपणीचा फोटो शेअर करण्यात आला होता. आता एका फॅन पेजवर गौतमीसह तिच्या आईचा एक गोड व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा