GautamI Patil Viral Video: गौतमी पाटील हिला अनेक स्तरावरून विरोध होत असतानाही त्याचा तिच्या लोकप्रियतेवर तिळमात्र परिणाम झालेला दिसत नाही. सोशल मीडियापासून ते प्रत्यक्ष शो मध्ये सर्वत्र गौतमीला बघायला येणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. आजवर अनेक तमाशा कलावंतांनी गौतमीच्या डान्सला लावणी म्हणण्यावर आक्षेप घेतला होता पण आता त्यावर सुद्धा गौतमीने एका मुलाखतीत स्पष्ट उत्तर दिले आहे. @theoddEngineer या चॅनेलवर झालेल्या मुलाखतीत गौतमीला “तू तमाशा करते का लावणी?” असा थेट प्रश्न विचारण्यात आला होता यावर तिने दिलेलं उत्तर ऐकून नेटकरीही तिची उपहासाने बाजू घेत आहेत.
गौतमी पाटीलने आपल्या शोवर लावण्यात येणाऱ्या आरोपावर उत्तर दिले की, “मी पूर्णपणे लावणी करतच नाही त्यामुळे माझ्या शो ला लावणीचा कार्यक्रम म्हणायची गरज नाही, तो एक डीजे शो आहे. मी लावणीच्या एखाद्या गाण्यावर नृत्य करते माझ्या शो मधील सहकलाकार सुद्धा एक दोन गाणी लावणीची घेतात पण इतर गाणी ही मराठी हिंदी सिनेमाची असतात. शिवाय मी माझ्या करिअरची सुरुवात लावणीपासूनच केली, अकलूज लावणी महोत्सवमध्ये मी पहिल्यांदा डान्स केला पण नंतर मी लावणीचे प्रशिक्षण घेतलेले नाही, त्यामुळे लावणी कशी असते याचा मी अभ्यास केलेला नाही”
गौतमी पाटील Video
हे ही वाचा<<गौतमी पाटीलचा कपडे बदलतानाचा Video व्हायरल करणाऱ्याला अटक; तपासात थक्क करणारी माहिती समोर
दरम्यान, कालपासून गौतमीचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे. काही दिवसांपूर्वी गौतमीचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता पुणे पोलिसांनी याप्रकरणात अहमदनगरमधून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. यावर प्रतिक्रिया देताना गौतमीने तो मुलगा पकडला गेला याचा आनंद आहे पण असे अनेकजण आहेत ज्यांना समज देण्याची गरज आहे अशा पद्धतीची कमेंट केली आहे.