आपल्या नृत्य आणि अदांनी वेड लावणाऱ्या गौतमी पाटीलला कोण ओळखत नाही. गौतमी पाटील ही नृत्यांगणा आहे जी अत्यंत लोकप्रिय आहे. पाव्हणं जेवला काय, पाटलाचा बैलगाडा, मी पाटलाची लेक अशा गाण्यांवर जबरदस्त डान्स करून तिने चाहात्यांच मन जिंकले आहे. ” “सबसे कातिल गौतमी पाटील” असे तिचे चाहते म्हणतात. दरम्यान गौतमी पाटीलने होळी निमित्त चाहत्यांना खास सरप्राईज दिले आहे. गौतमीने होळी साजरी करतानाचे तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत जे पाहून चाहते खुश झाले आहेत.
नेसली पांढरी साडी अन् गालाला लावला लाल रंग…
गौतमीने पांढऱ्या रंगाची ऑर्गेंन्झा साडी नेसली आहे. या साडीवर काळ्या रंगाचा कॉन्ट्रॉस्ट ब्लाऊज परिधान केला आहे. तिने केस मोकळे सोडले आहेत आणि मिनिमल ज्वेलरी परिधान केली आहे. गौतमी कपाळावर छोटीशी काळी टिकली लावली आहे ज्यामुळे तिचे सौंदर्य आणखी खुलून दिसत आहे. गौतमी गालावर लाल रंग लावलेला दिसत आहे. तिचा हा लूक चाहात्यांना घायाळ करत आहे.
हेही वाचा – Viral Video : भावाच्या लग्नात बहिणींचे झिंगाट नृत्य, तरुणींचा जबरदस्त डान्स एकदा बघाच
नृत्य करत जिंकले चाहत्यांचे मन
गौतमीने “रंग लागला” या मराठी गाण्यावरनृत्य केले आहे. त्याचबरोबर गौतमीने होळीचे प्रसिद्ध गीत “मुखडे पे रंग लगाऐ, बडा रंगीला सजनीया…” या गाण्यावर नृत्य केले आहे. तिच्या कातिल अदांवर चाहते फिदा झाले आहेत. व्हिडाओवर चाहत्यांनी कमेंट करत तिचे कौतूकही केले आहे एकाने लिहिले, “महाराष्ट्राचं फुलपाखरू कलर फुल” दुसऱ्याने लिहिले की, “अतिशय सुंदर सुरेख अप्रतिम सोनपरी लयभारी सुपरस्टार महाराष्ट्र क्वीन कौतुक करावं तेवढं कमीच नारी तू नारायणी राजराजेश्वरी नारीशक्ती तुझे सलाम” तर काहींनी तिला होळीच्या शुभेच्छा दिल्या. एकाने लिहिले की, होळीच्या अग्नीत जळू दे दु:ख सारे, तुमच्या आयुष्यात येऊ दे, आनंदाचे क्षण सारे.. होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!
गौतमीच्या अंदावर चाहते झाले फिदा
गौतमीने काही फोटो शेअर केले आहेत ज्यामध्ये ती सुंदर दिसत आहे. चाहत्यांनी फोटोवरही कमेंट करत तिचे कौतूक केले आहे. एकाने लिहिले की,
“सबसे अलग गौतमीची झलक”