Abhishek Ray and Chaitanya Sharma Gay Wedding: कोलकात्यात झालेल्या एका अनोख्या लग्नाची चर्चा सध्या जोरात सुरूय. या अनोख्या लग्नाचे फोटोज सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरू लागले आहेत. हे लग्न नवरा-नवरीच्या स्पेशल एन्ट्रीमुळे नव्हे, राजेशाही थाटात केलेल्या लग्नामुळे नव्हे, नवरीच्या एन्ट्री डान्समुळे नव्हे तर चक्क दोन गे कपलच्या लग्नामुळे ही चर्चा सुरूय. कारण हा विवाहसोहळा कुणा सेलिब्रिटीचा नव्हे तर समलिंगी जोडप्याचा आहे, ज्यांनी लग्नादरम्यान कुटुंबीय आणि नातेवाईकांसमोर एकमेकांचा हात धरला होता. फॅशन डिझायनर अभिषेक रे आणि डिजिटल मार्केटिंग तज्ञ चैतन्य शर्मा या दोघांनी एकमेकांसोबत लग्नगाठ बांधलीय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हा विवाह सोहळा अतिशय खाजगी होता. या लग्नाला फक्त निवडक आणि खास लोकांनी हजेरी लावली होती. पण सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंवरून हे स्पष्ट झाले आहे की लग्नसोहळा अतिशय भव्य पद्धतीने आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये हळदी-मेहंदी आणि वरमाला यांसारख्या बहुतेक विवाह विधीं पार पडले होते. हे फोटो पाहून काही लोकांना आश्चर्य वाटत आहे तर काहींना त्रास होत आहे. पण LGBTQ समुदायासाठी, लग्नाचे फोटो एक नवीन आशा आहेत, ज्यामुळे त्यांच्या नात्याला सामाजिक मान्यता मिळण्याची आशा आहे.

आणखी वाचा : गाय पाण्यातून चालली होती, अचानक करंट लागून तडफडत जमिनीवर कोसळली आणि मग… पाहा VIRAL VIDEO

आणखी वाचा : देसी ढोलाच्या तालावर थिरकले विदेशी नागरिक, जबरदस्त डान्सचा हा VIRAL VIDEO पाहा

यावेळी फॅशन डिझायनर अभिषेक रे यांनी पारंपारिक बंगाली नवरदेवाप्रमाणे कपडे परिधान केले होते. धोती-कुर्त्यामध्ये अभिषेक रे सजून धजून दिसून येत होता. तर चैतन्यने शेरवानी घातली होती. या जोडप्याच्या कलर कॉम्बिनेशनमुळे ग्लॅमरमध्ये आणखी भर पडली आहे. या दोघांच्या हळदी सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओही इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आले आहेत. या गे वेडिंगचे फोटो पाहिल्यानंतर फेरे घेऊन लग्नसोहळा पार पडल्याचं दिसत आहे. लग्नाची तयारी मोठ्या थाटात करण्यात आली होती, ज्यामध्ये गे कपल उघड्या छतावर म्हणजेच सनरूफ असलेल्या कारमध्ये नाचताना दिसले.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : वर्षभर शिकवून मुलाला गणितात इतके गुण मिळाले की पाहून वडील ढसाढसा रडले!

आणखी वाचा : VIRAL VIDEO : धाडसी पोलीस अधिकाऱ्याने जीवाची पर्वा न करता दलदलीत अडकलेल्या माणसाचा जीव वाचवला!

या लग्नाला बंगाली आणि मारवाडी कुटुंबांनी हजेरी लावली होती आणि यावेळी दोन्ही समाजातील धार्मिक विधी विवाहात पार पडले. लग्नसोहळ्यातील या फोटोंमध्ये दोघांची खास बॉन्डिंग स्पष्टपणे दिसत आहे. ज्या आनंदात आणि जल्लोषात या लग्नाचे विधी पार पडले ते पाहून लोक विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.