-अंकिता देशकर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Ramayana Songs In America’s Got Talent: द इंडियन एक्सप्रेसला एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसला. या व्हिडिओ मध्ये दोन युवक रामायणाचे शीर्षक गीत एका स्टेज वर गात असल्याचे दिसले. द इंडियन एक्सप्रेसला हा व्हायरल व्हिडिओ फेसबुक आणि ट्विटरला व्हायरल होत असल्याचे दिसले. “इंडियन आयडलसारखा अमेरिकन शो असतो ज्यात अमेरिकेतील मुलांनी रामायण मालिकेचे गीत गाऊन सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आणले होते, भारत माता की जय” असे म्हणत हा व्हिडीओ अनेकांनी शेअर केला आहे तसेच यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा टॅग करण्यात आले आहे.
Viral Video: अमेरिकन मुलांनी गायली रामायणाची गीते
Indian idol जैसाअमेरिकन show में अमेरिकन बच्चो ने रामायण सीरियल का टाइटल song गाया और सब की आँखों ने अश्रुधारा आने लगी …..माँ भारतीय ? pic.twitter.com/khr7JdyZkb
— ravish parmar (@ParmarRavish) April 24, 2023
Indian idol जैसाअमेरिकन show में अमेरिकन बच्चो ने रामायण सीरियल का टाइटल song गाया और सब की आँखों ने अश्रुधारा आने लगी …..माँ भारतीय ?@narendramodi pic.twitter.com/PdIgQXcIof
— chowkidar richali awasthi(modi ka parivar) (@prptystation) April 24, 2023
Indian idol जैसाअमेरिकन show में अमेरिकन बच्चो ने रामायण सीरियल का टाइटल song गाया और सब की आँखों ने अश्रुधारा आने लगी …..माँ भारतीय ? pic.twitter.com/2IW5enQcnJ
— कृष्णगोपाल (मोदी परिवार) (@BNP92618725) April 17, 2023
तपास:
आम्ही तपासाची सुरुवात, व्हायरल व्हिडिओ इन्व्हिड टूल मध्ये अपलोड करून किफ्रेम्स मिळवण्यापासून केली. आम्हाला यातून बरेच स्क्रीनग्रॅब मिळाले आणि त्या नंतर प्रत्येक स्क्रीनग्रॅब वर आम्ही गूगल रिव्हर्स इमेज सर्च वापरले. एक फोटो ज्यात दोन्ही स्पर्धकांचे चेहरे दिसत होते, त्या चित्रावर आम्ही गूगल रिव्हर्स इमेज ने शोधल्यास आम्हाला एक परिणाम मिळाला. आम्हाला globalnews.ca वरील एक रिपोर्ट दिसला, ज्याचे शीर्षक होते, Boys perform anti-bullying rap on ‘Britain’s Got Talent’
WATCH: Boys perform anti-bullying rap on ‘Britain’s Got Talent’
आम्ही त्यानंतर गूगल वर काही किवर्डस वापरून तपास सुरु केला. त्यातून आम्हाला युट्युब वर Britain’s Got Talent च्या अधिकृत चॅनेल वर या व्हिडिओ क्लिपचा ओरिजिनल व्हिडिओ मिळाला.
या व्हिडिओ च्या डिस्क्रिप्शन मध्ये इंग्रजीत लिहिले होते की, Simon finally gets around to pushing his Golden Buzzer for a youthful musical duo. Bars & Melody combine cuteness and originality, charming our audience with their skills.
हा व्हिडिओ मे ११, २०१४ रोजी अपलोड करण्यात आला होता. ४ मिनिट २० सेकंदांपासून सुरु होणारी क्लिप सध्या एडिट करून व्हायरल केली जात आहे. फॉक्स न्यूज वर देखील एक बातमी जुलै ३१, २०१४ रोजी या सादरीकरणाबद्दल आढळली. त्याचे शीर्षक होते: Listen: Boys blow away Simon Cowell with anti-bullying song
हे ही वाचा<< “सचिन तेंडुलकरमुळे १००९ धावा करणाऱ्या ‘त्या’ खेळाडूवर अन्याय…”अर्जुनचा फोटो लावून संतापजनक पोस्ट
निष्कर्ष: अँरिकां टॅलेंट शोमध्ये स्पर्धकांनी ‘रामायण’ शीर्षक गीत गायले नाही, व्हायरल व्हिडिओ एडिट केलेला आहे. मूळ व्हिडिओ ब्रिटेन्स गॉट टॅलेंटचा आहे, जिथे दोन मुलांनी गुंडगिरी विरोधी गाणे गायले आहे.