Dog Attack Video: आजकाल मोठ्या सोसायट्यांमध्ये लोक आपल्या पाळीव श्वानांंना मोकळेपणाने फिरायला सोडतात. हे श्वान कधी आक्रमक होतील हे सांगता येत नाही. अनेकदा त्यांनी लोकांवर केलेल्या हल्ल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होतात. अनेक प्रकरणे इतकी भयानक आहेत की, श्वानांबद्दल लोकांमध्ये एक वेगळीच भीती निर्माण होते. त्याचबरोबर गेल्या काही वर्षांत श्वान चावण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. असेच आणखी एक प्रकरण समोर आले आहे, ज्यामध्ये एक श्वान एका मुलीला आपली शिकार बनवण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु मुलीची आई लगेचच आपल्या मुलीला वाचवण्यासाठी धावते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

श्वानाने मुलीवर केला हल्ला

हे प्रकरण गाजियाबादचे आहे, जिथे जर्मन शेफर्ड जातीच्या श्वानाने सायकलवरून जात असलेल्या मुलीवर अचानक हल्ला केला. या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये एक महिला आपल्या जर्मन शेफर्डला फिरायला सोसायटीच्या बाहेर घेवूून येत असल्याचे दिसत आहे. तेवढ्यात एक सायकल चालवणारी मुलगी तिथे येते आणि श्वान तिच्यावर अचानक हल्ला करतो. महिलेला श्वानाला सांभाळता येत नाही. लोकांना काही समजण्यापूर्वीच श्वान मुलीच्या हातावर चावा घेतो. यानंतर मुलीची आई मुलीला वाचवण्यासाठी धावत येते आणि श्वानाला पळवून लावते. ही घटना पाहून आजूबाजूचे लोकही घटनास्थळी जमा होतात.

(हे ही वाचा : ट्रॅफिक पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी तुम्ही ‘असा’ अतरंगी जुगाड कधी केलात का? व्हायरल व्हिडीओ पाहून पोट धरुन हसाल )

येथे पाहा व्हिडिओ

मुलीच्या हातावर आणि कमरेला जखमा

श्वानाने हल्ला केल्यानंतर त्याचा मालक त्याला स्वतःकडे ओढत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. यानंतर ती त्याच्यासोबत बाजूला जाते. तर सोसायटीचा रक्षक महिलेला समजावताना दिसत आहे. ही घटना पाहून तेथे खेळणारी मुले चांगलीच घाबरली. इतर काही लोकही तिथे जमतात. श्वानाने हल्ला केल्याने सहा वर्षीय निष्पाप मुलीच्या हाताला व कमरेला जखमा झाल्या आहेत. या घटनेचा व्हिडीओ सोसायटीमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे, ज्यानंतर तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पोस्ट होताच सोशल मीडियावर पुन्हा एकदा धोकादायक श्वानांबाबत चर्चेला उधाण आले आहे.