अयोध्येत रामाचे भव्य मंदिर उभारले जात आहे. २२ जानेवारीला रामललाच्या मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या कार्यक्रमासाठी देशभरातील लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीही अयोध्येला पोहोचणार आहेत. दरम्यान, देशभरातील आणि जगभरातील लोक प्रभू रामाच्या नावाचा जप करणार आहे. काही लोक श्री रामाचे भजन गाणार आहे. ही गाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत शेअर करत आहेत. नेपाळपासून अमेरिकेपर्यंत सर्वत्र प्रभु रामाच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त लोकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. दरम्यान, एका जर्मन गायिकेचा श्री रामाचे भजन गातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये गायक ‘राम आयेंगे तो अंगना सजाऊंगी’ हे गाणे गाताना दिसत आहे. राम भजनासाठी सोशल मीडिया यूजर्सनी जर्मन गायिकेचे कौतुक केले आहे. ‘कॅसांड्रा मे स्पिटमन'(‘Cassandra May Spitman) असे या जर्मन गायिकेचे नाव आहे. सोशल मीडियावर लोक कॅसांड्राच्या गाण्याचं खूप कौतुक करत आहेत. “यांच्यामध्येही राम वसतो” असे एकाने म्हटले आहे. नेटकरी सतत ‘जय श्री राम’ अशा कमेंट व्हिडीओवर करत आहेत. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जर्मन गायिका कॅसांड्राच्या गाण्यांचे कौतुक केले आहे. याचा उल्लेख त्यांनी त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमातही केला होता.
हेही वाचा – विराट कोहलीची सुपरमॅन झेप पाहून आनंद महिंद्रांनी थेट न्युटनला विचारला प्रश्न; म्हणाले, “सर, गुरुत्वाकर्षण…”
हेही वाचा – “थंडीत अंघोळ न करणाऱ्यांसाठी व्यक्तीने सुरु केला नवा बिझनेस; आनंद महिंद्रांनी व्हिडीओ शेअर करत केले कौतुक
सप्टेंबर २०२३ मध्ये त्यांनी मन की बात कार्यक्रमात २१ वर्षीय जर्मन गायिका कॅसांड्राचा उल्लेख केला होता. “कॅसॅन्ड्रा तिच्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. पण तिला अनेक भाषांचे ज्ञान आहे. ती वेगवेगळ्या भाषांमध्ये गाणी गाते. नुकतेच कसेंड्राने ‘श्रीहरी स्तोत्रम’ गायले होते. याआधी त्यांनी शिव तांडव स्त्रोतम, शिव पंचाक्षर स्त्रोतमही गायले होते. याचा संदर्भ देत पीएम मोदींनी कॅसांड्राचे कौतुक केले होते. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात कॅसांड्राने गायलेली गाणी समाविष्ट केली होती. “असा सुरेल आवाज आणि प्रत्येक शब्द भावनांचे दर्शन घडवतो” असे ते म्हणाले होते. “देवावरील त्याचे प्रेम देखील आपण अनुभवू शकतो. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, हा आवाज जर्मनीतील एका मुलीचा आहे.”