प्रेमाला कोणतीही मर्यादा नसते…आणि म्हणूनच आजकाल भारतातील अनेक मुलं परदेशी मुलींशीही लग्न करू लागले आहेत. भारतीय लोक परदेशी मुलींशी लग्न करून परदेशात स्थायिक होत असल्याची अनेक उदाहरणे आपण पाहिली असतील. अनेक प्रकरणांमध्ये परदेशी मुली देखील भारतात येतात, प्रेमात पडतात आणि इथल्या संस्कृतीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतात. आजकाल सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक परदेशी सून शेतात काम करताना दिसत आहे. महत्वाचं म्हणजे ती सहज हिंदी देखील बोलत आहे. यावर तिच्या सासूने दिलेली प्रतिक्रिया चांगलीच व्हायरल होतेय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, या विदेशी महिलेने भारतीय पद्धतीचे कपडे घातले आहेत आणि तिने भांगेत कुंकू देखील भरले आहे. ती शेतात कांद्याची पेरणी करत आहे. तिला शेतात काम करताना पाहून तिचा नवरा येतो आणि तिला विचारतो ‘ मी तुला काही विचारू शकतो’, ज्यावर ती हिंदीत ‘हो नक्की’ म्हणते. मग नवरा तिला विचारतो ‘तू कुठली आहेस’, तर ती म्हणते की मी जर्मनीची आहे आणि इथे शेतात कांदा पेरतेय. मग तिचा नवरा थट्टा करत तिला विचारतो की, ‘तू सातासमुद्रापार जर्मनीहून भारतात कांदा लावायला आली आहेस का’, तेव्हा बायकोही आनंदाने ‘हो’ म्हणते. त्याच वेळी, ती असेही म्हणते की तिला मजा येत आहे, खूप छान वाटत आहे. यादरम्यान दूर उभ्या असलेल्या परदेशी सुनेची सासूही हसताना दिसते.

( हे ही वाचा: Video: लग्नात बेभान नाचत होती ‘ही’ महिला; उड्या मारत असा डान्स केला की पाहुणेही झाले फिदा)

परदेशी सून शेतात कांदा पेरतानाचा व्हिडिओ एकदा पाहाच

( हे ही वाचा: मगरीने पक्षी समजून ड्रोन कॅमेऱ्यावर केला भयानक हल्ला; पाण्यातून लांबलचक उडी मारतानाचा Video Viral)

हा व्हिडिओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे. हा मजेशीर व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘नमस्तेजुली’ नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत १९ दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तसंच अनेकजण यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील देत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: German woman planting onion in a farm with desi style indian mother law reaction video goes viral gps